पुण्यात वाढले ‘बिर्याणी जॉईंट्स’चे प्रमाण लक्षणीय

सुवासिक मोकळ्या भातासह शिजलेल्या भाज्यांची किंवा चिकन, मटणाची बिर्याणी (Biryani) घेण्यासाठी उभे असलेले किंवा घेऊन खाणारे ग्राहक हे चित्र पुण्यात सध्या सर्रासपणे पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे, गेल्या काही महिन्यांमध्ये शहरभरात बिर्याणी देणाऱ्या हॉटेलांचे किंवा छोटय़ा ‘बिर्याणी जॉईंट्स’चे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरातील काही ठराविक हॉटेल्सच बिर्याणीसाठी प्रसिद्ध होती. मात्र, अलीकडे हे चित्र बदलले आहे. शहरभरात ठिकठिकाणी बिर्याणी देणारी हॉटेल, बिर्याणी जॉईंट तयार झाल्याचे दिसून येत आहे. हैदराबादी बिर्याणी, तंदूर बिर्याणीसह विविध प्रकारची बिर्याणी या उपाहारगृहांमध्ये, ‘बिर्याणी जॉईंट्स’मध्ये उपलब्ध होते. त्यामुळे बिर्याणी देणाऱ्या नामांकित उपाहारगृहांसह आता छोटय़ा उपाहारगृहांमध्येही किफायतशीर दरात बिर्याणी मिळू लागली आहे. खवय्येही या बिर्याणीचा आस्वाद घेताना दिसून येतात.

गारवा बिर्याणीचे भागीदार श्रेयस उभे म्हणाले, की माझे बंधू राजेंद्र शिंदे यांच्यासह जानेवारी 2020 मध्ये सदाशिव पेठेत बिर्याणीचे छोटेखानी हॉटेल सुरू केले. बिर्याणी आतापर्यंत ठराविक ठिकाणी मिळायची आणि ती सर्वानाच परवडण्यासारखी नव्हती. त्यामुळे सर्वांना परवडणारी बिर्याणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

करोनाकाळात बिर्याणीला मोठी मागणी आहे. बिर्याणीमधून प्रथिने, कर्बोदके आदी घटक मिळत असल्याने बिर्याणी आरोग्यदायीही आहे. गेल्या दीड वर्षांत शहराच्या विविध भागात शाखा सुरू केल्या आहेत. पूर्वी छावणी परिसरात असलेले कॅफे आता मध्यवर्ती शहरात आणि उपनगरांमध्ये मोठय़ा प्रमाणात झाले आहेत.या कॅफेंमधून बर्गर, मोमो, विविध प्रकारचे रोल्स हे खाद्यपदार्थ चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. (फोटो क्रेडिट गुगल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.