देशामध्ये आर्थिक संकट आणि अराजक माजले असतानाही श्रीलंकेच्या संघाने आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी केली असून रविवारी पाकिस्तानवर सरशी साधून त्यांना जेतेपद पटकावण्याची संधी मिळेल. श्रीलंकेतील बिकट परिस्थिती आणि सुरक्षेच्या कारणास्तव आशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तांत्रिकदृष्टय़ा श्रीलंकाच या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे.
या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेने सलग चार सामन्यांत विजय नोंदवले आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुसरीकडे, कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शादाब खान यांसारख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या पाकिस्तानला श्रीलंकेला नमवण्याचा विश्वास आहे.
- वेळ : सायं. ७.३० वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी