भारतात दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे, दुसरीकडे मृत्यूदरही कमी होत आहे. त्यामुळे असं लक्षात येत आहे की, देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. पण कोरोना अद्याप गेला नाही त्यामुळे नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. गेल्या 24 तासांत 80 हजार 834 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रूग्णांची आकडेवाडी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
देशात कोरोना रूग्णांची संख्या 2,94,39,989 वर पोहोचली आहे. तर 24 तासांत 3 हजार 303 रूग्णांचे प्राण गेले आहेत. देशात आतापर्यंत एकुण 3 लाख 70 हजार 384 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्यांची संख्या 90.07 टक्के आहे.
देशात 2,80,43,446 कोरोनावर मात केली आहे. तर उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 10 लाख 26 हजार 159 इतकी आहे. देशासह महाराष्ट्रात देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे.
राज्यात 14 हजार 910 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 10 हजार 697 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासात 360 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.