दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास घेत स्वतःचा जीवन प्रवास संपवाला. पण त्याच्या मृत्यूनंतर सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली अशा चर्चा जोरदार पसरल्या होत्या. आता त्याच्या आत्महत्येचं रहस्य उलगडणारा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटचं नाव ‘न्याय : द जस्टिस’ (Nyay : The Justice)असं असून चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.
ट्रेलरमध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक रहस्य थोडक्यात दाखवण्यात आले आहे. सुशांतचं फिल्मी करियर, त्याचं रिलेशनशिप, सुशांतला झालेला मानसिक त्रास इत्यादी गोष्टी दिग्दर्शकाने प्रखरपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
‘न्याय : द जस्टिस’ चित्रपटात झुबेर हा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या भूमिकेत दिसणार आहे. विकास प्रॉडक्शन अंतर्गत साकारण्यात आलेला चित्रपट ‘न्याय : द जस्टिस’चा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा सुशांतच्या आत्महत्ये भोवती फिरत आहे. सुशांतच्या चाहत्यांना देखील चित्रपटाबद्दल प्रतीक्षा होती.