हा प्रश्न चर्चा करूनच
सुटणार : अनिल परब
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयासमोर आहे. याबाबत योग्य तो निर्णय उच्च न्यायालय देईल, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे. “मी कामगारांना सांगितले आहे की हा प्रश्न चर्चा करुनच सुटणार आहे. न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्याचे आम्ही पालन करु. मी कर्मचाऱ्यांना अनेक दिवस सांगत आहे की कामावर या आणि आपण चर्चा करु,” असे अनिल परब म्हणाले.
माजी मंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कारण, अनिल देशमुख यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. तसेच, सचिन वाझेला देखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आल्याचं समोर आलं आहे. या अगोदर न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता.
शिवाजी महाराजांचा सेवक साक्षात
त्यांची सेवा करण्यासाठी निघाला
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात निधन झालं. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना समाजातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पुरंदरेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक आज साक्षात त्यांची सेवा करण्यासाठी निघाला, अशा शब्दांत राज यांनी पुरंदरे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शांततेला
धक्का दिला जातोय : शरद पवार
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, महाराष्ट्रात काही संघटना अशा घटनांना खतपाणी घालतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या. या प्रवृत्तींना किती महत्त्व द्यायचं, हे लोकांनी ठरवावं. राज्य सरकार चांगलं काम करत असतांना तीन, चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं गेलं आहे. राज्य सरकार चांगलं काम करताना बंदचा निर्णय, नैराश्यातून सामाजिक शांततेला धक्का बसेल असं काम काही राजकीय पक्षांचे घटक करतायत हे दुर्दैवी आहे.
अमरावती बंद प्रकरणी भाजपच्या
काही नेत्यांना अटक
अमरावतीत बंद’मध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या काही नेत्यांना पोलिसांनी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. अनेक नेत्यांना त्यांच्या राहत्या घरामधून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजपाचे नेते आणि महापालिकेचे गटनेते तुषार भारती यांना अटक करण्यात आली आहे. अमरावती शहरातील साईनगर कॉलनीतील गणेशविहार येथील राहत्या घरातून केली अटक पोलीस तुषार भारतीय यांना घेऊन सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचेही समजते.
रझा अकादमी ही अतिरेकी
संघटना : नितेश राणे
रझा अकादमी ही अतिरेकी संघटना आहे हे मी फार जबाबदारीने म्हणतो आहे. जशा दहशतवादी संघटना काम करतात तशी ही संघटना काम करत आहे. मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम ही रझा अकादमी करत आहे. रझा अकादमी ज्यांनी सुरु केली ते अफगाणिस्तानातील आहेत. त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा ठेवायची. तीन तलाकचा विरोध या रझा आकदमीने केला. मुस्लीम समाजाचा विकास होणे रझा अकादमीला मान्य नाही. त्यांनी करोना लसीकरणाला विरोध केला होता. फ्रांसच्या राष्ट्रपतीच्या भाषणाला देखील रझा अकादमीने विरोध केला,” असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
पाकिस्तान नवीन पाठवलेले
600 कोटींचे ड्रग्ज जप्त
गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोरबी जिल्ह्यात ड्रग्जविरोधात (Drugs) मोठी कारवाई केलीय. पोलिसांनी मालिया मियाणामधून ६०० कोटी रुपयांचे १२० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणाचं ‘कनेक्शन’ पाकिस्तानचा ड्रग माफिया खालिद बख्शसोबत आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानमधूनच भारतात पाठवण्यात आल्याचंही बोललं जातंय. याबाबत पोलीस महासंचालक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
काश्मीर मध्ये तापमान
गोठणबिंदूच्या खाली
काश्मीरमधील तापमान हे रात्रीच्या वेळी गोठणबिंदूच्या खाली गेले असून या मोसमात प्रथमच ते इतके खाली गेले आहे. काश्मीर खोऱ्यात आता थंडी पडू लागली असून काश्मीरच्या अनेक भागात रविवारी धुके दिसत होते. तापमान गोठणिबदूच्या खाली गेल्याने सकाळच्या वेळी धुके दाटले होते. काश्मीर खोऱ्यात प्रथमच तापमान गोठणिबदूच्या खाली गेल्याने थंडीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. श्रीनगरमध्ये तापमान उणे ०.९ अंश सेल्सियस होते. पहलगाम हे अमरनाथ यात्रेसाठीचा मुक्काम तळ असून तेथे उणे ३.५ अंश सेल्सियस तापमान होते. पहलगाम हे काश्मीरमधील सर्वात थंड ठिकाण आहे.
SD social media
9850 60 3590