पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे जगाला पर्यायी इंधनांचा विचार करण्यास भाग पाडले आहे. भारतासह अनेक देश वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. मात्र, जपान असा एक देश आहे की तो हायड्रोजनचा इंधनाला प्राधान्य देत आहे. जपानप्रमाणे काही देशांनी हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर सुरू केला आहे.
अलीकडेच, जपानी ऑटोमेकर टोयोटाच्या मिराई कारने हायड्रोजन इंधनावर सर्वात लांब अंतर कापण्याचा जागतिक विक्रमही केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकदा इंधन भरल्यानंतर 1360 किमीचा प्रवास पूर्ण केला. या कालावधीत एकूण 5.65 किलो हायड्रोजन वापरण्यात आले. यानुसार, कारने 260 किमी प्रति किलोचे मायलेज दिले.
कंपनीच्या मते, टोयोटा मिराई 2016 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. हे कंपनीचे पहिले फ्युएल सेल Electric vehicle म्हणजेच हायड्रोजन इंधनावर चालणारी कार होय. ही कार उत्तर अमेरिकेत रिटेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक सोप्या पद्धतीने सांगायचे झाले तर, हायड्रोजन इंधनाचा वापर लोकांसाठी बराचसा सिद्ध होणार आहे. तथापि, भारतात आतापर्यंत हायड्रोजन इंधनाकडे पर्याय म्हणून पाहिले जात नाही.