‘इंडियन आयडॉल 13’ च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘इंडियन आयडॉल’ चं हे पर्व तब्बल ९ महिने चाललं. संपूर्ण देशाला या शोच्या विजेत्याची उत्सुकता होती. अखेर 9 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर देशाला या टीव्ही सिंगिग रियालिटी शोच्या 13 व्या पर्वाचा विजेता मिळाला आहे. टॉप 6 फायनलिस्टमध्ये ऋषी सिंग, शिवम शाह, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, देबस्मिता रॉय आणि सोनाश्री कर यांचा समावेश होता. ट्रॉफीसाठी सर्व स्पर्धकांनी चुरशीची लढत दिली. तसेच इंडियन आयडल फिनालेच्या अखेरच्या टप्प्यात जनेतेने लाईव्ह व्होटिंगद्वारे विजेत्याची निवड केली. विजेत्याचं नाव ऐकून सगळेच खुश झाले आहेत.
अयोध्येच्या ऋषी सिंगने बाजी मारत विजेतेपद पटकावलं आहे. ऋषी सिंग या सीझनचा विजेता ठरला आहे, तर देवोस्मिता राय ही पहिली उपविजेती ठरली आहे. तर चिराग कोतवाल याने दुसरा उपविजेता ठरला. ऋषी सिंगने सर्वांना मागे टाकत यंदाचं विजेतेपद पटकावलं आहे. ऋषीवर सध्या देशभरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऋषी सिंह हा या पर्वाच्या ऑडिशनपासूनच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता. त्याच्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.ऑडिशनमध्येच प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या ऋषीने अखेर विजेतेपद पटकावल्याने सगळ्यानांच आनंद झाला आहे.
ऋषी जिंकल्याने त्याच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं. तसेच ऋषीला इथपर्यंत पाठवण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या त्याच्या चाहत्यांनाही आनंद झाला. टॉप 6 फायनलिस्टमध्ये ऋषी याच्यासह शिवम शाह, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, देबस्मिता रॉय आणि सोनाश्री कर यांचा समावेश होता. मात्र लाईव्ह व्होटिंगच्या आधारावर ऋषीने बाजी मारली. इतर प्रतिस्पर्ध्यांनी ऋषीला चांगली टक्कर दिली. मात्र अखेरीस ऋषीचाच विजय झाला.
ऋषी सिंह याला इंडियन आयडल ट्रॉफीसह रोख 25 लाख रुपये बक्षिस आणि 1 मारुती सुझुकी एसयूव्ही कार गिफ्ट म्हणून देण्यात आली. इतकंच नाही तर ऋषीला सोनी म्यूजिक इंडियासह रिकॉर्डिंग कॉन्ट्रॅक्टही मिळालं. एका क्षणात ऋषीच्या भविष्याला कलाटणी मिळाली. दरम्यान या फिनालेमध्ये नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया परीक्षकाच्या भूमिकेत होते. तर आदित्य नारायण याने या फिनालेचं यशस्वीपणे निवेदन केलं.