नागपूर मध्ये डेंग्यूचा कहर

राज्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेकडून डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम राबवली जात आहे. अनेक ठिकाणी सर्वेक्षण करुन विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.

नागपुरात आज डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे 8689 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यापैकी 383 घरांमध्ये डेंग्यूच्या अळी आढळून आल्या.
नागपुरात डेंग्यूचा वाढता कहर पाहता डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरांमध्ये सर्वेक्षण केले जात आहे. तसेच याबाबत आवश्यक त्या उपाययोजनाही राबवल्या जात आहेत.

नागपूर महापालिकेतर्फे डेंग्यू प्रतिबंध मोहीम जोरात सुरु आहे. पालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या पथकाद्वारे 8689 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी 383 घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. याशिवाय 85 ताप असलेले रुग्ण आढळून आले. तसेच 212 जणांच्या रक्तांच्या नमूण्यांची तपासणी करण्यात आली. तर 27 जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले आहेत.

या सर्वेक्षणादरम्यान 1784 घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात 133 कुलर्समध्ये डासअळी आढळून आल्या आहेत.

गोंदिया जिल्ह्यात कोरोना आटोक्यात असताना आता मलेरीयासह डेंग्यूने डोके वर काढले. मलेरीयाने जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहगाव येथील विनायक राऊत वय 32 याचा पहिला मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय. जिल्ह्यात कोरोनापेक्षा आता मलेरीयाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या तब्बल 193 मलेरियाचे रूग्ण तर डेंग्यूचे 13 रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली आहे. (फोटो क्रेडिट गुगल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.