सालार ए मिल्लत एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने औरंगाबादमध्ये एक शाळा उभारण्यात येत आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष तेलंगणा येथील आमदार अकबरुद्दीन ओवैसी आहेत.
या शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये आले आहेत. त्यांच्या दौऱ्याची औरंगाबाद शहराचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार तयारी केली आहे.
खासदार जलील यांनी ‘आ रहा हू मै…’ अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांच्या औरंगाबाद दौऱ्याची माहिती दिली होती. अकबरुद्दीन ओवैसी यांचे औरंगाबाद येथे आगमन झालं. त्यांनतर त्यांनी शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.
त्यांच्या ट्रस्टच्या शाळेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीवर जाऊन तिथं फूल अर्पण केली. औरंगाबादसह खुलताबाद तालुक्यातील दर्ग्याना सुद्धा त्यांनी भेटी दिल्या.
आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेब यांच्या कबरीला भेट दिल्यामुळे औरंगाबाद येथील वातावरण तापले आहे. यावरून खासदार जलील यांनी अकबर ओवेसी आज त्यांच्या भाषणातून महाराष्ट्राला नवा विचार देणार आहेत. हे तुम्हाला त्यांच्या भाषणातून कळेल. सोबत औरंगजेबच्या कबरचे दर्शन घेणं वाईट नाही. इथं अनेक महापुरुषांची समाधी आहे. जो कुणी खुलताबादेत जातो तो औरंगजेब समाधीवर जातोच असं सांगत त्यांनी औरंगजेबच्या कबरीवर गेल्याचं समर्थन केलंय.