बाळा नांदगावकर यांच्या नावे फेसबुकवर अकाऊंट, पैशाची केली मागणी

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन त्यावरुन पैशाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्वत: फेसबुक पोस्ट टाकत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच याबाबत त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

फेसबुकवर खाली फोटो मधील नावाने जे अकाऊंट आहे ते हॅक झाले आहे. त्या अकाउंटवरुन कोणीतरी माझ्या नावाने पैशाची मागणी करीत आहे. त्यामुळे अशा कोणत्याही मागणीला कोणीही बळी पडू नये. माझे Blue Tick वाले हे अकाऊंटच अधिकृत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

मित्रांनो आजकालच्या या टेकनॉलॉजीच्या युगात आपण खूप सावध असले पाहिजे. नुकतेच माझ्या नावाने विविध फेसबुक अकाऊंटवर काही भामटयांनी अनेकांना मेसेज करून पैसे मागितले. याबद्दल मी रितसर तक्रार नोंदविली आहे. पण कोणीही असो पैसे मागितल्यावर, कधीही कोणाच्याही नावाने मागितले तरी त्याला खात्री केल्याशिवाय अजिबात 1 दमडीही देऊ नये. ज्या 2 नंबर वरून ते मागितले गेले ते खालीलप्रमाणे.

7376801541
8607892210

सामान्य जनतेचे आपल्या नेत्यांवर प्रेम असते आणि या प्रेमापोटी तो कधी कधी अशा लबाडीला बळी पडू शकतो. परंतु आपणास विनंती आहे की आत्ताच नाही तर इथून पुढेही कधी असा प्रकार झाल्यास अशा मागणी करणाऱ्यास 1 रुपया हि आपण देऊ नये. आपली माझ्यावरील प्रेमा पोटी फसवणूक होऊ नये म्हणून आपणास या पोस्ट द्वारे ह्या सगळ्या बाबतीत सूचित करीत आहे. – आपला नम्र बाळा नांदगावकर, अशी फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे. दरम्यान बाळा नांदगावकर यांचे ही फेसबुकचे फेक अकाऊंट नेमकं कधी तयार केलं गेले आहे. ते कुठून तयार केले गेले आहे, यामागे कोणाचा हात आहे, याचा सर्वाचा तपास पोलिस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.