कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्ली येथे होणार अंत्यसंस्कार
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले. ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर १० ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातील आणि विदेशातील त्यांचे चाहते प्रार्थना करत होते. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्ली येथे होणार अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या परिवाराने सांगितले.
शिंदे-फडणवीसांमुळे पवार वेटिंगवर, नाराज अजित पवार तीन तास थांबून निघाले!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अजित पवारांना तब्बल तीन तास थांबायला लागल्याची माहिती समोर आली आहे. कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस न पोहोचल्यामुळे अजित पवार नाराज होऊन निघून गेल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाची बैठक लांबल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यक्रमाला वेळेत पोहोचू शकले नाहीत.
मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री आणि विरोधी पक्षनेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. दुपारी 12 वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होणार होती. मंत्रिमंडळ बैठक 11 वाजता सुरू झाली होती. या कार्यक्रमासाठी अजित पवार 12 वाजता मंत्रालयात पोहोचले, पण मंत्रिमंडळ बैठक लांबल्यामुळे पवारांना माहिती-जनसंपर्क सचिवांच्या कार्यालयात जाऊन बसले.
बॉलिवूडवर पुन्हा शोककळा! अशोक कुमार यांची लेक भारती जाफरीचं निधन
बॉलिवूडमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका अभिनेत्रीचं निधन झालं. राजू श्रीवास्तव यांच्या निधनातून बॉलिवूड सावरत नाही तर दुसरीकडे अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी अभिनेत्री भारती जाफरीचं निधन झालं आहे. 20 सप्टेंबरला भारतीनं अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारानं तिचं निधन झालं आहे. भारतीवर मुंबईच्या चेंबूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले. अभिनेत्री आणि फिल्ममेकर नंदिता दास यांनी ही माहिती दिली. भारती यांच्याबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा देत नंदिता दास भावुक झाल्या. भारती जाफरी यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
LPU विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला नवा ट्वीस्ट, सुसाईड नोटमध्ये प्राध्यापकाचं नाव
मंगळवारी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये डिझायनिंगच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी इजिन एस दिलीप कुमार याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याची सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. यामध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याने आपल्या मृत्यूसाठी एनआयटी कालिकत येथील प्राध्यापकाला जबाबदार धरले आहे.
संजय राऊत तुरुंगात, खुर्ची मेळाव्यात, शिवसेनेच्या कार्यक्रमात स्पेशल जागा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा बोलावला आहे. शिवसेनेच्या या मेळाव्यासाठी व्यासपीठावर वेगळी खूर्ची ठेवण्यात आली आहे. शिवसेना नेते अनंत गिते आणि भास्कर जाधव यांच्या मध्ये संजय राऊत यांची खूर्ची ठेवण्यात आली आहे. संजय राऊत हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. या प्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे.
मोदी सरकारचं मराठवाडा-विदर्भाला गिफ्ट, लॉजिस्टिक पार्कच्या ड्रीम प्रोजेक्टचा करार फायनल!
वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं होतं, यामुळे विरोधकांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. यानंतर आता केंद्रातल्या मोदी सरकारकडून मराठवाडा आणि विदर्भाला मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. भारत माला प्रकल्पाअंतर्गत लॉजिस्टिक पार्क तयार करण्यासंदर्भातला करार आज करण्यात आला आहे. या लॉजिस्टिक पार्कमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे.
हा लॉजिस्टिक पार्क जालन्यामध्ये तयार होत आहे. या लॉजिस्टिक पार्कमुळे इतर भागातील उद्योगासोबत संबंध तयार होतील, तसंच मुंबईला जाऊन कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्तता आता जालन्यातच पूर्ण होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. जालन्यातला लॉजिस्टिकचा हा प्रकल्प 450 कोटींचा आहे. डिसेंबर 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचंही रावसाहेब दानवे म्हणाले.
नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हिसा संपून तीन वर्षानंतरही दोन परदेशी महिला भारतातच
नागपूरच्या एका नामांकित हॉटेलमधून दोन उझबेकिस्थानिक महिलांना अटक करण्यात आली आहे. व्हिसा संपल्यानंतर देखील त्या बनावट आधार कार्ड तयार करून भारतात राहत होत्या. तसेच एका भारतीय दलालामार्फत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होत्या. या संदर्भात नागपूर पोलिसांनी दोन्ही महिलेसह दलालांना अटक केली आहे.
SD Social Media
9850 60 3590