कधी जाहीर होणार दहावी आणि बारावीचे निकाल? समोर आली महत्त्वाची माहिती
दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यी आणि पालकांना निकालाचे वेध लागतात. मात्र यंदा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यामुळे दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आता विद्यार्थी आणि पालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. बारावी बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो. तर दहावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो.
अभिनेत्री दीपाली सय्यदने पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं? जवळच्या व्यक्तीकडून खळबळजनक खुलासा
शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. पाकिस्तानमध्ये दीपाली सय्यद यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा खळबळजनक दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन भाऊसाहेब शिंदे यांनी हे गंभीर आरोप केले.प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाऊसाहेब शिंदे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात मी दीपाली सय्यदचे अंडरवर्ल्डशी संबंध असणारे अनेक पुरावे प्रशासनाला दिले आहेत, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मी तुम्हाला दीपाली सय्यद यांच्या बँक खात्यांचा तपशील दिला आहे. २०१९ मध्ये दिपाली सय्यद यांना पाकिस्तानचा नकली पासपोर्ट देण्यात आला. त्या पासपोर्टची प्रतही मी तुम्हाला दिली. दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचं राष्ट्रीयत्व स्वीकारलं आहे. पाकिस्तानात त्यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा दावा शिंदे यांनी केला.
सुनावणी पुढे ढकलल्याने आरोपीची सटकली, थेट चप्पल काढून न्यायाधीशांवर भिरकावली
एका ४० वर्षीय आरोपीनं कुर्ला येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयातील न्यायाधीशांवर चप्पल फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. संबंधित खटल्यातून मुक्त न झाल्याने आणि वारंवार सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहावं लागत असल्याने आरोपीनं हे कृत्य केलं आहे. या प्रकारानंतर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.घटनेच्या दिवशी शनिवारी न्यायालयाने तायडे विरोधातील सुनावणी पुढे ढकलली. यानंतर आरोपी तायडेचा स्वत:वरील ताबा सुटला आणि त्याने न्यायालयात आदळआपट करायला सुरुवात केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीनं मागणी केली की, त्याच्यावरील सर्व प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढावेत आणि न्यायालयाच्या खटल्यातून मुक्तता करावी.”
केंद्रात, राज्यात सत्ता आहे, मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी मुहूर्त बघताय का? अजित पवारांचा सवाल
केंद्रात, राज्यात सत्ता आहे, मग कुठल्या वेळेची वाट बघताय?मुहूर्त बघताय का? सावरकरांना भारतरत्न देण्याचा, असा थेट सवाल अजित पवार यांनी उपस्थित करून वेळ कशाची असते, अजूनही खूप मोठ्या व्यक्ती आहेत, महापुरुष आहेत त्यांना भारतरत्न मिळायचा बाकी आहे. त्यात सावरकर आहेत, असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे. गौरवयात्रा काढता मग कोश्यारी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व इतर महापुरुषांबद्दल भाजपचे मंत्री, प्रवक्ते आमदार यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली. त्यावेळी त्यांना का थांबवण्यात आले नाही? त्या महापुरुषांबद्दल का गौरव यात्रा काढण्यात आल्या नाहीत? हे निव्वळ राजकारण आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
बंगालमधील दंगलीमुळे तृणमूल काँग्रेस अडचणीत
रामनवमीच्या सणानिमित्त पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्ये दंगली उसळल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या मुस्लीम समाजापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. ६७ टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघात तृणमूलचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मुस्लीम समाजाचा विश्वास संपादन करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पण तृणमूल काँग्रेसच्या (TMC) राज्यात दंगली उसळत असल्याचा संदेश सर्वदूर गेल्यामुळे ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. रामनवमीच्या दिवशी जेव्हा ठिकठिकाणी दंगली उसळत होत्या, तेव्हा ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलनला बसल्या होत्या. केंद्राकडून बंगालचा निधी रोखणे आणि तृणमूलमधील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई होत असल्याच्या विरोधात ममता बॅनर्जी आंदोलन करत होत्या.
जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींचं पहिलं ट्वीट! म्हणाले, “माझा संघर्ष…”
राहुल गांधी यांना आज सुरत कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांना जामीन मंजूर केला आहे. तर त्यांच्या दुसऱ्या याचिकेवरची सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. मात्र सुरत कोर्टातून जामीन मिळताच राहुल गांधींसह सगळ्याच काँग्रेस नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यानंतर राहुल गांधी यांचं पहिलं ट्वीट चर्चेत आहे. माझा संघर्ष सुरू आहे आणि सत्य हेच माझं अस्त्र आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
Twitter ने भारतातील तब्बल ६ लाखांपेक्षा जास्त अकाउंट्सवर घातली बंदी
एलॉन मस्क यांनी Twitter ची खरेदी केल्यापासून कंपनीमध्ये सातत्याने काही बदल करण्याचा प्रयत्न मस्क करत आहेत. अनेक निर्णय ते घेत आहेत. मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ट्विटरने २६ जानेवारी २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत कंपनीच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतातील ६,८२,४२० अकाउंट्स बंद केली आहेत. या अकाउंट्सवरून बाल लैंगिक शोषण आणि गैर-सहमतीने नग्नतेला प्रोत्साहन दिल्याचे कारण देत ट्विटरने ही कारवाई केली आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डेंचं ‘सुमी आणि आम्ही’ नाटक लवकरच रंगभूमीवर
लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार आणि चित्रकार अशा विविध भूमिकांमधून सर्जनशील मुशाफिरी करणारे ज्येष्ठ कलाकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांचे कलाक्षेत्रातील योगदान मोठे आहे. कलेच्या वेगवेगळया माध्यमातून व्यक्त होताना पुरुषोत्तम बेर्डे यांच्या प्रत्येक कलाकृतीवर त्यांच्या दांडग्या अभ्यासाची आणि सर्जनशीलतेची किनार दिसून आली आहे. अशा या हुकमी दिग्दर्शकाचे ‘सुमी आणि आम्ही’ हे नवं नाटक रंगभूमीवर येतंय. विशेष म्हणजे या नाटकाद्वारे तब्ब्ल ९ वर्षांनी ते नाटयदिग्दर्शन करतायेत. नाटकाच्या संगीत, नेपथ्याची जबाबदारी ही तेच सांभाळणार आहेत.
मुंबईविरुद्धच्या विजयानंतर कोहलीचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल २०२३ ची धमाकेदार सुरुवात केली आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने बंगळुरुला १७२ धावांचे लक्ष्य दिले होते. आरसीबीने या लक्ष्याचा विराट कोहली (नाबाद ८२) आणि फाफ डुप्लेसिस (७३) यांच्या खेळीच्या जोरावर सहज पार केले. या विजयानंतर कोहलीने आरसीबीच्या टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.आरसीबी संघाने आतापर्यंत आयपीएलच्या एकाही हंगामात आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले नाही. त्यामुळे या संघावर सातत्याने टीका होत असते. परंतु आता विराट कोहलीने मुंबईविरुद्धच्या विजयानंतर टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. मुंबई चेन्नईनंतर आरसीबीने सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले याचा कोहलीला अभिमान आहे.
SD Social Media
9850 60 3590