राज्यात सध्या सर्वत्र पाऊस होत आहे. यातच नागपुरातून एक वाईट बातमी समोर आली आहे. सकाळपासून पाऊस सुरू असल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थी आऊटिंग करायला गेले होते. मात्र, त्यांचा नागपुरातील अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाला.
हे दोन्ही जण चप्पल धुवायला दोघे तलावात उतरले होते. मात्र, त्यांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. मिहीर शरद उके (वय 20, इंदोरा) व चंद्रशेखर किशोर वाघमारे (वय 20, लष्करीबाग) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे दोन्ही मृत विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.