महाराष्ट्रात आज ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. राज्यातील विविध 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. एकूण 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी या निवडणूक होणार आहे. यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता उद्याची ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं एकत्रित महाविकास आघाडीचं सरकार होतं. पण राज्यात आजच्या घडीला शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचं एकत्रित सरकार आहे. राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनाचा ग्रामपंचायत निवडणुकीत खरंच परिणाम होतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती जागा मिळतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
राज्यातील ‘या ‘जिल्ह्यांमध्ये ग्रामपंतायत निवडणूक
• ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70.
• रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1.
• रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10.
• सिंधुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2.
• नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71.
• नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.
• पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1.
• सातारा: जावळी- 1, पाटण- 1 व महाबळेश्वर- 1.
• कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.
• अमरावती: चिखलदरा- 1
• वाशिम: वाशिम- 1.
• नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8.
• वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7.-
• चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1.
• भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 1 व साकोली- 1.-
• गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- नामांकन व अर्जुनी मोर- 2.-
• गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1.
• एकूण- 1,166.