रेल्वेप्रवाशांची सोय व्हावी म्हणून भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा नव्या रेल्वे गाड्या सुरु केल्यात.पूर्व मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्टेशनवर थांबणाऱ्या 7 जोडी म्हणजेच 14 स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. 24 जूनपासून पुढील आदेशापर्यंत या सर्व गाड्या सुरु ठेवल्या जाणार आहेत. या गाड्या बिहार-झारखंडमधील पटणा, मुजफ्फरपुर, राजगीर, गया, रांची, धनबाद आदींचा यात समावेश आहे.
05215 आणि 05216 मुजफ्फरपुर-नरकटियागंज-मुजफ्फरपुर स्पेशल ट्रेन 24 जूनपासून पुढी आदेशापर्यंत दररोज धावेल. 03234-03233 दानापूर-राजगीर-दानापूर स्पेशल ट्रेन 24 जूनपासून पुढील आदेशापर्यंत होणार आहे.
03243-03244 पटना-भभुआ रोड-पटना (व्हाया गया) स्पेशल ट्रेन 24 जूनपासून पुढील आदेश मिळेपर्यंत दररोज सुरू असेल. 03249-03250 पटना-भभुआ रोड-पटना (व्हाया आरा) स्पेशल ट्रेनची सुरुवात 24 जून ते पुढी आदेश येऊपर्यंत असेल.
03303-03304 धनबाद-रांची स्पेशल ट्रेन 24 जूनपासून पुढी आदेश येईपर्यंत दररोज सुरू असेल. 03387-03388 हावरा-धनबाद-हाडा स्पेशल ट्रेनची सुरुवात होईल.
03319-03320 रांची-देवघर-रांची स्पेशल ट्रेन 24 जून से 30 जूनपर्यंत दररोज सुरु राहिल. या गाडीचे थांबे आधी घोषित केल्याप्रमाणेच असतील. प्रवासात सर्वांना कोविड नियमावली पाण्यास सांगण्यात आलंय.