आज दि.२७ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

राज्यात होणार आणखी एक युती, संभाजीराजेंची ओपन ऑफर, पण घातली एक अट!

‘स्वराज्य संघटना ही एक ब्रँड असून आम्ही पुढील निवडणुकामध्ये युती करावी यासाठी शिंदे-फडणवीस किंवा ठाकरे यांच्याकडे जाणार नाहीत त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं’, असं म्हणत स्वराज संघटनेचं संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी ऑफरच दिली.धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये आज स्वराज्य संघटनेच्या 58 शाखेचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.

कसब्यात मतदानापेक्षा गुन्ह्यांचीच चर्चा जास्त; रासने, धंगेकर यांच्यानंतर आणखी दोन नेत्यांवर कारवाई

कसबा पोटनिवडणुकीतील घडामोडी मतदान झाल्यावर देखील सुरू आहे. भाजप नेते गणेश बिडकर यांच्यावर मारहाण प्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकडे भाजप उमेदवार हेमंत रासने, तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर देखील आता पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही आचारसंहितेचा भंग केला आहे. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर देखील गोपिनियतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक मतदानात काल (रविवारी) भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केले होते. याप्रकरणी रासने यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केलेल्या रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली होती.

नशीब काढलं पठ्ठयानं! छप्पर फाडके लॉटरी; एकाच दिवशी मिळाली नोकरी आणि छोकरी

 ‘उपरवाला जब भी देता है, तो छप्पर फाड़ के देता है’ अशी हिंदी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. ‘देव जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो’ अशा आशयाची ही म्हण प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठचा रहिवासी असलेल्या तरुणाच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला आहे. या तरुणाला एकाच दिवशी नोकरी आणि बायको दोन्हीही मिळालं आहे. रविवारी लग्नाच्या दिवशीच या तरुणाला पोलीस उपनिरीक्षक पदाचं नियुक्तीपत्र मिळालं आहे. अनुज कुमार असं या तरुणाचं नाव आहे. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर अनुजच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. तो म्हणतो की, पोलीस उपनिरीक्षकाची नोकरी आणि लग्न एकाच दिवशी होत असल्याच्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही.

औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता पुढचा नंबर कोणाचा? भाजपकडून नाव बदलण्यासाठी हालचाली?

नुकतीच महाराष्ट्र सरकारने राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबादचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामांतर करण्यास मंजुरी दिली आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाने अहमदनगरचे अहिल्या नगर असे नामकरण करण्याची मागणी सुरू केली आहे. अहमदनगरचे नाव अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर करण्याची मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी केली.

भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात झाला. म्हणूनच अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर असे नामकरण व्हावे अशी आमची इच्छा आहे, असे सांगून ते म्हणाले, “औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे आधीच बदलण्यात आल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत.” सध्या गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी दुसऱ्यांदा मांडली आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र सरकारला याबाबत पत्र लिहिले होते.

 ‘किसान चाचीं’च्या लोणच्याची चवच न्यारी, थेट मुख्यमंत्रीच आहेत जबरा फॅन!

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठात आयोजित शेतकरी मेळाव्यात देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या शेतकऱ्यांनी नवीन माहिती दिली. या मेळाव्यात एक नाव मात्र प्रत्येकाच्या ओठांवर येत होतं, ते नाव होतं ‘किसान चाची’. या मेळाव्यात ‘किसान चाची’च्या हातच्या लोणच्याचं लोकांना इतकं वेड लागलं की, लोणचं खाल्ल्यावर लोक अक्षरशः बोटं चाटू लागली. या किसान चाची मुझफ्फरपूर जिल्ह्यातील सरैया गावच्या रहिवासी आहेत.सरैया येथील रहिवासी राजकुमारी देवी यांच्या लोणच्याच्या चवीनं लोकांना वेड लावलं आहे. याचाच परिणाम म्हणजे लोकांच्या जेवणाच्या ताटात लोणचं दिसतं. मुजफ्फरपूरमध्ये एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कार्यक्रम होता, त्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार राजकुमारी देवी यांच्या हातचं लोणचं चाखण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांनी लोणचं चाखताच त्यांना त्याची चव आवडली.

राजकुमारी देवी उर्फ ‘किसान चाची’ यांनी सांगितलं की, 1990 च्या दशकात जेव्हा महिला घराबाहेर पडायला घाबरायच्या, तेव्हा मी शेती करू लागले. त्या काळी शास्त्रोक्त पद्धतीने सेंद्रिय शेती केली जायची. यादरम्यान मी सायकल चालवायला शिकले. त्यानंतर 2002 पासून मिक्स लोणचं बनवण्यास सुरुवात केली. सायकलवरून लोणचं लोकांच्या घरी पोहोचू लागलं. सुरुवातीच्या काळात लोणचं विकताना खूप त्रास सहन करावा लागला. पण हळूहळू लोकांना माझ्या लोणच्याची चव आवडू लागली आणि माझं लोणचं सर्वांच्या ताटात दिसू लागलं.’

गोंदिया जिल्ह्यातील आठ गावांची मध्यप्रदेशात विलीनीकरणाची मागणी

राज्य सरकारचे दुर्लक्ष व वेळकाढू धोरणामुळे गोंदिया जिल्ह्यातील आठ गावे मध्यप्रदेशला विलीनीकरणाची मागणी आमगाव नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे. यात आमगाव, बनगाव, किडंगीपार, माल्ही, पदमपुर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा ही गोंदिया जिल्ह्यातील आठ गावे त्यांचे विलीनीकरण सीमावर्ती राज्य मध्यप्रदेश येथे करावे या मागणीसाठी सोमवारी २७ फेब्रुवारी २०२३ ला येथील स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालय गाठून निवेदन सादर केले.

दमदार बॅटरी अन् मोठ्या ड्रायविंग रेंजसह देशात आल्या ‘या’ दोन इलेक्ट्रिक टू-व्हीलर

बेंगळुरू-मुख्यालय असलेल्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅटफॉर्म Yulu ने, Bajaj Auto च्या भागीदारीत, आज २७ फेब्रुवारी रोजी भारतात दोन नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर (e2Ws) Miracle GR आणि DeX GR in India लाँच केले. कंपनीचा दावा आहे की, ही नवीन इलेक्ट्रिक वाहने युलूचे एकूण आर्थिक मेट्रिक्स सुधारण्यासाठी उच्च कार्यक्षमतेची ऑफर देतात.

Yulu च्या AI-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान स्टॅकद्वारे समर्थित आणि केवळ Bajaj Auto द्वारे उत्पादित, Miracle GR आणि DeX GR हे जगासाठी भारतात बनवलेले आहेत आणि चेतक तंत्रज्ञान (बजाज ऑटोची १०० टक्के मालकीची उपकंपनी) द्वारे आणले जात आहेत.

“ट्रेलर, टिझर नाही थेट सिनेमाच…” गुढीपाडव्याला राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार?

महाराष्ट्रात आत्ता जे काही घडलं आहे त्याविषयी तुमचं नेमकं काय मत आहे असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना विचारला असता महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. मात्र या सगळ्याबाबत मी माझी भूमिका आत्ता मांडणार नाही. टिझर, ट्रेलर काहीही देणार नाही तर शिवतीर्थावर २२ मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याच्या सभेत थेट सिनेमाच दाखवणार आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांची मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नवी मुंबईत मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.

‘पठाण’ची यशस्वी घोडदौड सुरूच; मोडणार बाहुबली २ चा रेकॉर्ड? आतापर्यंत कमावले ‘इतके’ कोटी

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक महिना होऊन गेला तरी ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवरील दबदबा कायम आहे. अवघ्या महिनाभरातच या चित्रपटाने जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर करत पठाणचे इतर भाषेतील कमाईचे आकडे सांगितले आहेत.ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श सोशल मीडियावर सक्रीय असतात. बॉलिवूड चित्रपटांचे समीक्षण आणि कमाईबद्दलचे अपडेट्स ते देत असतात. त्यांनी ‘पठाण’ चित्रपटाचे तामिळ, तेलगू भाषेतील कमाईचे आकडे दिले आहेत. गेल्या आठवडयातील ‘पठाण’ची कमाई आहे १८. १६ कोटी तर हिंदी तामिळ आणि तेलगू या तिन्ही भाषेची मिळून एकूण ५२५. ७६ कोटी इतकी कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

EPFO चा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! हायर पेन्शनसाठी आता 3 मेपर्यंत करता येणार अर्ज

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत हायर पेन्शनसाठी अर्ज करण्यांसाठी एक दिलासाजनक बातमी आहे. ईपीएफओने हायर पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ मेपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी पात्र सदस्यांना हायर पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी ३ मार्च २०२३ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. पण आता पात्र सदस्य रिटायरमेंट फंड बॉडी एंप्लॉयीड प्रोव्हिडेंट फंड ऑर्गेनायझेशन (EPFO) युनिफाइड मेंबर्स पोर्टलद्वारे ३ मेपर्यंत आपला अर्ज सादर करु शकतात. यासाठी EPFO युनिफाइड मेंबर्स पोर्टलची URL नुकतीच अ‍ॅटिव्ह करण्यात आली आहे. ज्यात सदस्यांना हायर पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी ३ मेपर्यंतची तारीख निश्चित केल्याचे दिसतेय.

सोन्याचे ‘एटीएम’

सोन्यावरील भारतीयांचे प्रेम जगजाहीर आहे. मात्र सोन्यावर प्रेम करणारे लोक भारतातच नाहीत तर जगभरात आहेत, त्यात आखाती देशात सोन्याला अधिक मागणी आहे. म्हणूनच जगातील पहिले सोन्याचे एटीएम आबुधाबी येथील एमिरेट्स हॉटेल येथे २०१० मध्ये उघडण्यात आले. भारतीयांचे सोन्यावर प्रेम असून देखील अशा प्रकारे सोन्याचे एटीएम भारतात आणण्यास २०२२ साल उजाडले. भारतात केरळमध्ये सोने खरेदीला अधिक प्राधान्य देतात. मात्र भारतात सोन्याचे पहिले एटीएम उघडले ते हैदराबादमध्ये. साध्या एटीएम आणि सोन्याच्या एटीएममध्ये किंवा इतर विक्री यंत्रांमध्ये मोठा फरक म्हणजे किंमत आणि गुणवत्तेची खात्री. त्यातही सोन्याचे भाव वेळोवेळी बदलणारे म्हणजे इतर वस्तूंसारखे नाही. शिवाय विक्री यंत्रांमध्ये रोख रक्कम स्वीकारली जाऊ शकते. पण सोन्याचे भाव जास्त असल्यामुळे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची सोय असली पाहिजे. सोन्याचा मोठा पेच म्हणजे त्याच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र. म्हणजे तेही सोन्याबरोबर मिळाले पाहिजे. सुरुवातीचे सोन्याचे एटीएम तर १० दिवसांत सोने परत देखील घ्यायचे. आपल्याकडे सोन्याच्या खरेदीचा आनंद काही निराळाच असतो. तसेच ग्राहकांचा कल सोन्याचे दागिने विकत घेण्याकडे अधिक असतो. त्यामुळे एटीएम खरेदी यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल असे दिसते.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.