उद्यापासून राज्यातील १८ जिल्हे अनलाॕक
राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे.राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा पाॕझिटिव्ह रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे ,त्या ठिकाणी पूर्णपणे अनलाॕक केली जाण्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
या पहिल्या स्तरामध्ये एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.धुळे, औरंगाबाद , बुलढाणा , भंडारा, गडचिरोली , चंद्रपूर , गोंदिया, जळगाव, जालना,लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक , परभणी , नांदेड, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ याठिकाणी पूर्णपणे अनलाॕक करण्यात येणार आहे.याची अंमलबजावणी उद्यापासूनच केली जाणार आहे.
राज्यातल्या बारावीच्या परीक्षा रद्द
राज्यातल्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा रद्द करण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राची वैधता
अमर्याद कालावधीसाठी वाढवली
शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या इच्छुकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची वैधता आता अमर्याद कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. शिक्षकी पेशा निवडण्याऱ्या इच्छुकांना फायदा होणार आहे. प्रमाणपत्राची वैधता ७ वर्षांसाठी होती. या कालावधीत शिक्षकाची नोकरी लागली नाही, इच्छुकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने निर्णय बदलत प्रमाणपत्राची वैधता अमर्याद कालावधीसाठी वाढवली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ही घोषणा केली आहे.
नाथाभाऊ अजूनही
आमचे पालकच
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीसंबंधी बोलताना नाथाभाऊ अजूनही आमचे पालकच असल्याचं म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
डिसले गुरुजी… जागतिक स्तरावर मिळाले
आणखी एक सन्मानाचे पद
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जागतिक बँकेने सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. डिसले गुरुजींची जून 2021 ते जून 2024 अशा तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
चीनमध्ये H10N3 हा बर्ड फ्लूचा
विषाणू माणसात आढळला
चीनमध्ये H10N3 हा बर्ड फ्लूचा विषाणू माणसात आढळून आला आहे, मानवात हा विषाणू आढळून येण्याची जगातील ही पहिलीच वेळ आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही घोषणा केली आहे. झेनजियांग शहरात ४१ वर्षांची एक व्यक्ती बर्ड फ्लूच्या H10N3 या विषाणूने बाधित झाली असून सध्या त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. हा संसर्ग फारसा गंभीर नसल्याचे सीजीटीएन टीव्हीने म्हटले आहे. चीनचे आजारांशी असलेले संबंध संपण्याचे नाव घेत नाही.
राज्याच्या गृहनिर्माण प्रधान
सचिवपदी मिलिंद म्हैसकर
राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर, तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (MMRDA) महानगर आयुक्तपदी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची वर्णी लागणी आहे. आर. ए. राजीव यांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची वर्णी लागली आहे. या पदाचा अतिरिक्त कारभार तूर्तास अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर सोनिया सेठी यांना त्यांच्याकडे पदाभार सोपवण्यास सांगितलं आहे. श्रीनिवास हे १९९१च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
पुलवामा जिल्ह्यात भाजपा
नेत्याची गोळ्या घालून हत्या
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. नगरसेवक असणारे राकेश पंडिता त्राल परिसरातील आपल्या मित्राची घरी असताना दहशतवादी घरात घुसले आणि गोळीबार केला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. राकेश पंडिता यांचा जागीच मृत्यू झाला तर गोळीबारात आसिफा मुश्ताक नावाची एक महिला जखमी झाली आहे. महिलेवर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे.
मध्यवर्ती बँक यंदाही प्रमुख
व्याजदर स्थिर ठेवणार
जून आणि जुलै महिन्यासाठी पतधोरण निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला बुधवारी प्रारंभ झाला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या या तीन दिवसांच्या बैठकीत द्विमासिक पतधोरणाची घोषणा शुक्रवारी होईल. मध्यवर्ती बँक यंदाही प्रमुख व्याजदर स्थिर ठेवेल, अशी अटकळ आहे.
मेहुल चोक्सीला भारतात
हजर करावे लागेल
पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावून फरार झालेल्या मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणार की नाही याकडे सध्या सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान डोमिनिकामधील हायकोर्टात मेहुल चोक्सीने केलेल्या याचिकेवरील सुनावणी स्थगित झाली आहे. दरम्यान कोर्टाने यावेळी देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला तात्काळ दंडाधिकारी कोर्टासमोर हजर केलं जावं असा आदेश दिला आहे.
गंगा नदीतील मृतदेहांना हटवण्याबाबत
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
करोना महासाथीच्या काळात गंगा नदीत वाहून येणाऱ्या मृतदेहांना त्वरित हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्र सरकार, उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य चार राज्यांना वाहून आलेले मृतदेह त्वरित हटवण्याबाबत निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका ‘युथ बार असोसिएशन ऑफ इंडिया’ने अॅड. मंजू जेटली यांच्यामार्फत दाखल केली आहे. याचिकेत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीत वाहून आलेल्या मृतदेहांची माहिती देत अशा करोना रुग्णांच्या मृतदेहांचे सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार किंवा दफनविधी करण्यासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे.
पूल वाहून गेल्याने साताऱ्यातून
महाबळेश्वर रस्ता बंद
महाबळेश्वरसह साताऱ्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळेच महाबळेश्वर आणि साताऱ्याला जोडणाऱ्या रस्त्याचा काही भाग वाहून गेलाय. जावळी तालुक्यातील मांमुर्डी गावानजीकचा सातारा महाबळेश्वरला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने साताऱ्यातून मेढामार्गे महाबळेश्वरला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरुन होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
आरोग्य सेवकाचा कोरोनानं मृत्यू झाल्यास,
50 लाख रुपयापर्यंतची रक्कम मिळेल
कोरोना विषाणू संसर्गाशी लढणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारनं एखाद्या आरोग्य सेवकाचा कोरोनानं मृत्यू झाल्यास त्याच्या विम्याचा क्लेम मंजूर करण्यासाठी नवीन प्रणाली सुरु करत आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज विम्याचा क्लेम प्रमाणित करतील आणि विमा कंपनी पुढील 48 तासांमध्ये क्लेमची कार्यवाही पूर्ण करेल. फ्रंटलाईनवर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा केंद्र सरकारची प्राथमिकता असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत
15 दिवसांनी वाढविली
देशभरातील व्यापाऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढविली. मे महिन्यासाठी मंथली सेल डिटेल्स सादर करण्याची अंतिम मुदत 11 जून होती, जी आता 15 दिवसांनी वाढवून 26 जून करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
तर अमेरिकेशी संघर्ष करू ,
पंतप्रधान बेंजामिन नेत्याहू
अमेरिका आणि इराणमध्ये 2015 चा अण्वस्त्र करार पुन्हा लागू करण्याबाबात चर्चा सुरु आहे. बराक ओबामा यांच्या कारकीर्दीतील हा करार दोन्ही देशांनी मान्य केला तर इराणवरील अनेक आर्थिक निर्बंध कमी होतील. मात्र, इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्याहू यांनी या कराराला विरोध केलाय. इराणकडून इस्राईलला असलेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी अमेरिकेशी संघर्ष करायची वेळ आली तर तेही करु, असं सूचक विधान बेंजामिन यांनी केलंय. ते इस्राईलची गुप्तचर संस्था मोसादच्या नव्या प्रमुख डेविड बार्निया यांच्या स्वागत समारंभात बोलत होते.
ग्लोबल वॉर्मिंगमुळं 750 चौरस
किलोमीटर बर्फ वितळला
औद्योगिकरणातून मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि त्यातून नफा यात अडकलेल्या माणसाला मात्र याकडे लक्ष द्यायलाच वेळ नसल्याचं पाहायला मिळतंय.
अशातच जागतिक हवामान बदलाने पृथ्वीचं तापमान वाढून अनेक परिणाम होत असल्याचं आता समोर येत आहेत. मागील 20 वर्षात आइसलँडवरील बर्फाचा जवळपास 750 चौरस किलोमीटर भाग वितळला आहे.
SD social media
9850 60 3590