पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निव्वळ संपत्ती 3.7 कोटी आहे, जी गेल्या वर्षीच्या 2.85 कोटींच्या तुलनेत 22 लाखांनी वाढली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, त्यांनी आपल्या घोषणेमध्ये याचा उल्लेख केला आहे.
नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या वेळी राष्ट्राला संबोधित केले. त्यांच्या आधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 10 वेळा, इंदिरा गांधींनी 16 वेळा आणि जवाहरलाल नेहरू यांनी 17 वेळा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले आहे.
पंतप्रधान मोदींचीही अनेक मंत्र्यांप्रमाणे शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांची गुंतवणूक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात 8.9 लाख रुपये, जीवन विमा पॉलिसीमध्ये 1.5 लाख आणि एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर बाँड आहेत जे त्यांनी 2012 मध्ये 20,000 रुपयांना खरेदी केले.
पंतप्रधानांच्या संपत्तीत झालेली वाढ मुख्यतः भारतीय स्टेट बँकेच्या गांधीनगर शाखेत त्यांच्या मुदत ठेवींमुळे आहे. पंतप्रधानांनी दाखल केलेल्या स्वयं-घोषणेनुसार, 31 मार्च रोजी मुदत ठेवींची रक्कम 1.86 कोटी रुपये होती. जी गेल्या वर्षी 1.6 कोटी रुपये होती.
2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी कोणतीही नवीन मालमत्ता खरेदी केलेली नाही. त्यांची एकमेव निवासी मालमत्ता ज्याची किंमत 1.1 कोटी रुपये आहे जी त्यांनी 2002 मध्ये खरेदी केली असली तरी ती संयुक्त मालमत्ता आहे आणि पंतप्रधानांकडे फक्त एक चतुर्थांश मालकी आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, 14,125 स्क्वेअर फूटच्या एकूण मालमत्तेपैकी मोदींचा हक्क फक्त 3,531 चौरस फूटांवर आहे.
अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात, सरकारने ठरवले होते की सार्वजनिक जीवनात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी सर्व केंद्रीय मंत्र्यांना त्यांची संपत्ती आणि दायित्वे स्वेच्छेने जाहीर करावी लागतील. या घोषणा सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत आणि पंतप्रधानांच्या वेबसाईटवरून मिळवता येतात.