आयपीएल (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर परदेशी खेळाडूंनी आपापल्या घराची वाट धरलीय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बॉलिवूड डेस्टिनेशन मालदीवला थांबले आहेत. इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू केविन पीटरसनने मालदीवमधला एक शर्टलेस फोटो शेअर केलाय ज्याला कॅप्शन दिलंय द रेड लिस्ट…. ज्याच्यावर ख्रिस गेलने एक मजेशीर कमेंट केलीय. ती कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरतेय.
केवीन पीटरसनच्या फोटोवर ख्रिस गेलची मजेशीर कमेंट
केवीन पीटरसन याने मालदीवच्या समुद्र किनारावरचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे.
दोस्तहो, माझ्यावर विश्वास ठेवा… केवीन पीटरसन वाढलेल्या पोटामुळे खराब दिसतोय. मला वाईट वाटतंय, तू रेड लिस्ट झालाय…’, अशी मजेशीर कमेंट ख्रिस गेलने केली आहे. ख्रिस गेलने केलेल्या कमेंटवर क्रिकेट फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट करण्यासाठी उड्या मारल्या आहेत.
आयपीएलमधील गेलची कामगिरी
आयपीएलच्या 14 व्या पर्वात ख्रिस गेलकडून धमाकेदार खेळी खेळली गेली नाही. त्याचं प्रदर्शन साधारण राहिलं. त्याने पंजाब किंग्जकडून 8 सामने खेळले. त्यामध्ये 25.42 च्या सरासरीने तसंच 133.83 च्या स्ट्राईक रेटने 178 रन्स केले.
आयपीएलचे उर्वरित सामने केव्हा, कुठे?
कोरोनामुळे 14 व्या पर्वात 29 सामने खेळवण्यात आले. तर 31 मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे हे उर्वरित सामने केव्हा आणि कुठे खेळवण्यात येणार, याबाबत आता सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र या उर्वरित मोसमातील सामन्याचे आयोजन कधी, कुठे आणि केव्हा खेळवण्यात येणार यावर बीसीसीआय आणि संबंधित अधिकारी सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.