भारत-पाक महामुकाबल्याआधी आयसीसीनं केली महत्वाची घोषणा
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान संघात दोन वेळा महामुकाबला रंगला. त्यात एकदा भारतानं तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं बाजी मारली. पण अवघ्या दीड महिन्यानंतर या दोन संघात पुन्हा एकदा लढत होणार आहे आणि तीही वर्ल्ड कपच्या रणांगणात. येत्या 16 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कपचं बिगुल वाजणार आहे. याच वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सलामीचा सामना रंगणार आहे तो पाकिस्तानसोबत. महत्वाची बाब म्हणजे या सामन्यासाठी क्रिकेट चाहते इतके उत्सुक आहेत की सामन्याच्या सव्वा महिना आधीच सगळी तिकीटं बुक झाली आहेत.
परिस्थितीशी झुंज देत सुरु केलं शिक्षण; 93.4% घेऊन ‘त्या’ आईनं पास केली दहावी
असं म्हणतात तुमचं वय आणि परिस्थिती काहीही असू देत जर तुमच्यात जिद्द असली तर सर्वकाही यशात बदलण्याची सखमता तुमच्यात असते. कधीकधी कुठली व्यक्ती वाईट परिस्थितीलाही आपल्या जिद्दीसमोर झुकण्यास भाग पाडते. त्यात जर ती व्यक्ती आई असेल तर तिच्यातील जिद्द दुपटीनं वाढते. अशीच एक आई आहे जिनं तीन मुलांचा सांभाळ करून दहावीची परीक्षा दिली. नुसती दिलीच नाही तर तब्बल 93.4% घेऊन ती क्रॅक करून दाखवली आहे.एखादी गोष्ट करण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर माणूस सर्व संकटानंतरही आपले ध्येय साध्य करू शकतो. असेच काहीसे काश्मीरमधील एका महिलेने केले आहे. तिनं लग्नानंतर तब्बल दहा वर्षांनी अभ्यास सुरू केला आणि दहावीत 93.4% गुण मिळवले आहेत.
या आईचा नाव आहे सबरीना खालिक. काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील ही महिला 3 मुलांची आई आहे. घरात अनेक जबाबदाऱ्या आहेत, पण त्यानंतरही सबरीना खालिकचे अभ्यासाशी असलेले नाते तुटले नाही. घरची परस्थिती बिकट असूनही तिनं जिद्दीनं दहावी पास करून दाखवली.
घरात व्हिडिओ गेम खेळत असताना अंगावर पडली वीज, आश्चर्यकारकरित्या बचावला तरुण
पावसाळ्यात विजांचा कडकडाट होणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. वीज पडतानाचं दृश्य तुम्ही प्रत्यक्ष अथवा सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. पण तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडताना पाहिली आहे का?
अंगावर वीज पडल्याने प्रसंगी लोकांचा मृत्युदेखील होतो. पण इंग्लंडमधल्या एका व्यक्तीसोबत वीज पडण्यासंबंधी एक विचित्र घटना घडली. पावसाळ्यात मोकळ्या जागेवर असलेल्या लोकांवर सहसा वीज पडते. परंतु, आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत, ती व्यक्ती त्याच्या घरात आरामात बसून व्हिडिओगेम खेळत होती. त्याचवेळी त्याच्या अंगावर वीज पडली.
जेलमधून बाहेर येताच KRK मोठी घोषणा; करणार राजकारणात एंट्री
स्वत:ला फिल्म क्रिटीक म्हणून घेणारा केआरके म्हणजेच कमाल रशिद खान काही दिवसांआधीच जेल मधूर बाहेर आला आहे. केआरकेला अटक केल्यानंतर त्याच्याकडून ट्विटर एक्सेस काढून घेण्यात आले होते. मात्र नुकतेच त्याला ट्विटरचे एक्सेस परत करण्यात आले आहेत. केआरकेनं ट्विटरवर कमबॅक करताच त्याच्या ट्विटनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ट्विटरवर परतताच केआरकेनं राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. अनेक दिवस केआरकेला अनेकांनी हलक्यात घेतलं होतं पण राजकारणात एंट्री केल्यानंतर सगळी गणित बदलू शकतात.
मुख्यमंत्र्यांनी टाळली संभाजीराजेंची भेट, दीड तास होते दालनाबाहेर उभे, राजे तसेच माघारी परतले!
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संभाजीराजे आक्रमक झाले आहे. याच मुद्यावर संभाजीराजे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आले होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीराजेंची भेट टाळली असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल दीड तास संभाजीराजे यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर ताटकाळत उभे राहावे लागले होते.
‘दोघं गुजरातचे, तिकडे काही गेलं तर…’, वेदांता महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर शरद पवारांचा गुगली
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना शरद पवार यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. हा प्रकल्प तळेगावला येणार होता, राज्य सरकारनेही तयारी केली होती, पण आता काही उपयोग नाही. आता चर्चा करण्यात अर्थ नाही, असं पवार म्हणाले आहेत.उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरही शरद पवारांनी निशाणा साधला आहे. उद्योगमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं, ते म्हणाले गेल्या वेळच्या सरकारची जबाबदारी आहे, पण गंमत आहे हे तिथेपण मंत्री होते, असा टोला पवारांनी लगावला. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. यानंतर पंतप्रधानांकडून महाराष्ट्राला आणखी मोठा प्रोजेक्ट देण्याचं आश्वासन मिळाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं, यावरही पवारांनी टोला हाणला. लहान मुलाची समजूत काढावी, तसं पंतप्रधान बोलले आहेत, असं वक्तव्य पवारांनी केलं.
“…तर मला सोमवारपर्यंत अटक करावी नाही तर सोमवारी पंतप्रधानांनी माझी माफी मागावी”; दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान
गुजरातमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी विरुद्ध आम आदमी पार्टी असा संघर्ष शिगेला पोहोचल्याचं चित्र पहायला मिळत आहे. गुजरातमध्ये आपची सत्ता येणार असा विश्वास पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे गुजरातमध्ये रणधुमाळी सुरु असताना दुसरीकडे दिल्लीमध्येही दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणातील (मद्यविक्री धोरण) कथित गैरव्यवहारांप्रकरणी भाजपा आणि आप आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह सात राज्यांतील २१ ठिकाणी १९ ऑगस्ट रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले होते. या छाप्यांमुळे दिल्लीत खळबळ माजली असून आम आदमी पक्ष (आप) आणि भाजप यांच्यातील राजकीय लढाई तीव्र झाल्याचं पहायला मिळालं होतं. आता याच छाप्यांचा संदर्भ देत मनीष सिसोदियांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली माफी मागावी असं म्हटलं आहे.
‘काम केलं तर मग…?’, अजित पवारांनी स्वत:च्याच पक्षाच्या नेत्यांना फटकारलं
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. जे आहे ते तोंडावर बोलायचं, असा त्यांचा स्वभाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या या स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा आली. अजित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या माजी आमदार-खासदारांना फटकारलं. हाती सत्ता असताना काम केले तर माजी कसा होणार? असा सवाल अजित पवारांनी केला.
“अजित पवार निवडणुकांमध्ये सातत्याने लाखाच्या पुढेच निवडून येतो. आपण माजी का होतो? त्याचे नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे”, अशा शब्दात अजित पवारांनी माजी आमदार-खासदारांना फटकारलं. “काम केले तर माजी कसा होणार? आजी-माजी नेत्यांनी संवाद यात्रेला सुरूवात करा. घरातली एकी बाहेरच्यांना दिसल्यास ते वाकडे नजरेने आपल्याकडे पाहणार नाही. तशी एकी निर्माण करा”, असं आवाहन अजित पवारांनी आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना केलं.
भारतातली पहिली फ्लेक्स-फ्युएल कार 28 सप्टेंबरला होणार लाँच
जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता जगभर दिसू लागले आहेत. प्रचंड पाऊस, मोठे पूर, वणवे या सगळ्यांमुळे सामान्य माणसाचं जगणं कठीण होऊन गेलंय. तापमानवाढीचा सामना करण्यासाठी जगभर विविध पावलं उचलली जात आहेत, ज्यात कार्बन उत्सर्जन कमी करणं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यासाठी भारत सरकारही प्रयत्नशील आहे. टोयोटा ही कार उत्पादक कंपनी 28 सप्टेंबर 22 ला एक नवी कार भारतीय बाजारात लाँच करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ही भारतातील पहिली फ्लेक्स-फ्युएलवर चालणारी कार असेल. ऑटोमोबाईल कॉम्पोनंट्स उत्पादक संघटनेच्या (ACMA) दुसऱ्या वार्षिक परिषदेत गडकरी बोलत होते. टोयोटा कंपनी कोणतं मॉडेल लाँच करणार आहे याबद्दल गडकरींनी माहिती दिली नाही. पण त्यांनी असं म्हटलं की ते नवी दिल्लीत फ्लेक्स-फ्युएल कारचं उदघाटन करणार आहेत.
पाकिस्तानी पंच असद रौफ यांचे निधन; शेवटच्या काळात विकत होते शूज
२००६ ते २०१३ या कालावधीत ICC च्या खास पॅनेलचा भाग असलेले माजी पाकिस्तानी पंच असद रौफ यांचे लाहोरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. याबद्दल पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनी ट्विट करून माहिती दिली. “असद रौफ यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. केवळ एक चांगला पंच नव्हे तर त्यांच्या मिश्किल व मस्तमौला स्वभावाने प्रत्येक भेटीत माझ्या चेहऱ्यावर हास्य कायम असायचे” असे म्हणत रमीज यांनी रौफ यांच्या आठवणींना उजाळा दिला. रमीज यांच्यासह अन्यही पाकिस्तानी क्रिकेट क्षेत्रातील दिग्जजांनी रौफ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
धक्कादायक… टी20 लीग गाजवणारे दोन खेळाडू वेस्ट इंडिज टीममधून का झाले आऊट?
टी20 वर्ल्ड कपसाठी आज वेस्ट इंडिजनं 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. निकोलस पूरनच्या नेतृत्वाखालील दोन वेळा टी20 वर्ल्ड कप जिंकाणारा वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी विश्वचषक मोहिमेत सामील होणार आहे. पण ही संघनिवड करताना वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. वर्ल्ड कपसाठीच्या या संघात आयपीएलसह जगातल्या टी20 लीग गाजवणाऱ्या दोन खेळाडूंना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज म्हणून आंद्रे रसेलची अख्ख्या जगात ख्याती आहे.पण वेस्ट इंडिजच्या वर्ल्ड कप संघातून मात्र रसेलला विंडीज क्रिकेट बोर्डानं वगळलं आहे.रसेलसोबतच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं 34 वर्षांचा ऑफ ब्रेक बॉलर सुनील नारायणलाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
SD Social Media
9850 60 3590