कोरोना महामारीविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत लवकरच मोठं यश संपादन करणार आहे. देश कोरोना विरोधातील या लढाईत प्रमुख्य शस्त्र असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा पार करणार आहे.
अशा परिस्थितीत हे यश साजरं करण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून एक थीम साँग लाँच केले जाणार आहे. लसीकरणाने 100 कोटींचा आकडा ओलांडताच हे थीम साँग देशभरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे.
कैलाश खेर यांच्या आवाजात हे थीम साँग 100 कोटी डोस पूर्ण झाल्यानंतर लाँच केले जाईल. त्याच वेळी, आज म्हणजेच शनिवारी देखील एक गाणे लाँच करण्यात आले आहे. हे गाणे लसीकरणाच्या जाहिरातीसाठी आहे, जे पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत तेल आणि वायू कंपन्यांनी संयुक्तपणे बनवले आहे. कैलाश खेर यांनीच या गाण्याला आवाज दिला आहे. लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा आकडा सोमवारपर्यंत ओलांडण्याचा अंदाज आहे.
काय म्हणाले मनसुख मांडवीया?
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, देशातील 97 कोटीहून अधिक लोकांना पहिला डोस दिला गेला आहे. पंतप्रधान मोदींनी भारतातील शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला आणि भारतात बनवलेली लस देशाच्या वापरात आली, यासाठी आम्हाला पूर्वीप्रमाणे परदेशांवर अवलंबून राहावे लागले नाही. आगामी काळात आम्ही 100 कोटी डोस देण्यास सक्षम असू.