आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा
गोंधळ, सकाळी एक तर दुपारी दुसरे केंद्र
आरोग्य विभागाच्या परीक्षेत न्यासा कंपनीने पुन्हा गोंधळ घातला आहे. 24 ऑक्टोबरला दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. पेपर दोन सत्रात आहेत. अशावेळी सकाळी एका जिल्ह्यात आणि दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आली आहेत. उमेदवारांनी निवडलेलं केंद्र न देता लांबची केंद्र दिली आहेत. काही उमेदवारांची एका पदाची परीक्षा देण्यासाठी 2 जिल्ह्यात नावे आली आहेत, तसंच वेळही एकच देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत
सरकारला सामान्य लोकांच्या
प्रश्नाविषयी आस्था नाही : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. सामान्य लोकांच्या प्रश्नांसंबधी या सरकारला आस्था नाही. असंही ते म्हणाले. शरद पवार म्हणाले की, ”सामान्य लोकांचे प्रश्न वाढत आहेत आणि केंद्रातील सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे. त्यांना त्या प्रश्नांसंबंधी आस्था नाही. आपण बघतो आहोत, साधारण दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहेत, असं कधी घडलं नव्हतं.
पक्षाच्या नेत्यांशी खुल्या
मनाने बोलते : सोनिया गांधी
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन अध्यक्षपदासाठी चर्चा होण्याची शक्यता होती. त्यानुसार याबाबत सोनिया गांधी यांनी भाष्य केले आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी बैठकीत काँग्रेस नेत्यांना सुनावले आहे. “मी पक्षाच्या नेत्यांशी खुल्या मनाने बोलते पण माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही,” असे म्हटले आहे. प्रत्येक पक्षाच्या सदस्याला काँग्रेसचे पुनरुज्जीवन हवे आहे, पण यासाठी एकता आणि पक्षाचे हित सर्वोपरी ठेवणे आवश्यक आहे असे सोनिया गांधी यांनी म्हटले.
दहशतवादी संघटनेच्या कमांडरला
सुरक्षा दलाच्या जवानांनी केले ठार
जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सुरक्षा दलांनाही मोठे यश मिळाले. पम्पोर चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर उमर मुश्ताक खांडे याला ठार केले. त्याचा आणखी एक साथीदारही ठार झाला आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला. शोध मोहीम अद्याप सुरू आहे.
पूर्वी दसऱ्याचं भाषण म्हणजे
पर्वणी आता नुसतच कोमट पाणी
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या भाषणावरुन उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत या मेळाव्यातल्या उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. आपल्या ट्विट संदेशात देशपांडे म्हणाले, “दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळंच आळणी, गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी”.
प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं
वागतंय : गोपीचंद पडळकर
विरोधी पक्ष भाजपा राज्य सरकार विरोधात आक्रमक झाला आहे, भाजपा नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या मुद्द्य्यावरून राज्य सरकावर निशाणा साधला आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवल्यात. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परीक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारताय. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही हे प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वागतंय.” असं पडळकर म्हणाले आहेत
सिंघू बॉर्डरवर झालेल्या हत्येप्रकरणी
सरवजीत सिंगचे आत्मसमर्पण
सुमारे वर्षभर शेतकरी आंदोलनामुळे देशभरात एक ठिकाण चर्चेत आहे ते म्हणजे हरियाणा-दिल्लीमधील सिंघू सीमारेषा…पण याच ठिकाणी एक मृतदेह आढळला होता. या ठिकाणी एका व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या व्यक्तीचा एक हात दोरखंडांनी बांधला होता, दुसरा हात मनगटापासून कापण्यात आला होता. या हत्येमागे निहंग शिखांचा गट जबाबदार असल्याचा संशय व्यक्त होता होता. दरम्यान संध्याकाळी निहंग सरवजीत सिंग याने पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. सरवजीत सिंग याने हत्या केल्याबद्दल आपल्याला खंत नसल्याचं म्हटलं आहे.
₹48,000 पेक्षा कमी झाले सोन्याचे दर, आता गुंतवणुकीची योग्य संधी?
सध्या सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे सहाजिकच अनेकजण सोने खरेदीला पसंती देतात. तुम्ही देखील सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोनेखरेदीआधी सोन्याचा लेटेस्ट भाव जाणून घेणे आवश्यक आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज वर आज सोन्याची किंमत सुमारे 47,300 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. याआधी काल सोन्याचा दर प्रति तोळा 48,000 रुपयांवर पोहोचला होता. कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याच्या दरातील ही घसरण प्रॉफिट बुकिंगमुळे आली आहे आणि एकूणच या मौल्यवान धातूबद्दल बाजारामध्ये सकारात्मक सेंटिमेंट आहे. शिवाय कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणारी महागाई आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमकुवतता- या दोन मोठ्या कारणामुळे पुढील महिन्यात सोन्याचे भाव वाढतच राहण्याची शक्यता आहे.
वैष्णोदेवी यात्रेसाठी
रेल्वेचे विशेष पॅकेज
आयआरसीटीसीकडून यावेळी वैष्णोदेवी धाम साठी तीन रात्री आणि चार दिवसांच्या टूर पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. जवळपास 5200 फूट उंचीवर असणाऱं हे मंदिर कटरापासून 12 किमी अंतरावर आहे. जिथं जाण्यासाठी भारतीय रेल्वेनं एक खास पॅकेज तयार केलं आहे. आयआरसीटीसीनं अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या पॅकेजची घोषणा केली आहे. ज्याची सुरुवात प्रती व्यक्ती 5795 रुपयांपासून होणार आहे.
SD social media
9850 60 3590