संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले, “मी… ”
मोदी आडनावारून केलेल्या वक्तव्यासंदर्भात काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यावरून आता देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. मी भारतासाठी लढतो आहे आणि मी त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?” या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. सर्व चोरांचे मोदी हे आडनाव आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप भाजप आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता. दरम्यान, याप्रकरणी काल राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांच्या शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संदस्यत्व रद्द करण्यात आलं.
मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ? रेडीरेकनर दरातही वृद्धी
राज्यात मुद्रांक शुल्कात १ एप्रिल २०२३ पासून १ टक्का वाढ होण्याची शक्यता असून रेडीरेकनरचे नवीन दरही अंमलात येणार आहेत.राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण असतानाही अर्थसंकल्पात करवाढ किंवा मुद्रांक शुल्कवाढीची घोषणा करणे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळले होते. मात्र आता ही वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच निर्णय होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यामुळे घरे महागण्याची चिन्हे आहेत.
सांगली: सात महिन्यात दुप्पट देण्याच्या आमिषाने सव्वा कोटींचा गंडा
बोगस गुंतवणूक कंपन्याच्या काढून सात महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे सव्वा कोटी रूपयांचा गंडा घालण्यात आल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी मुजाहिद उर्फ राज अस्लम शेख (वय 40 रा.सुभाषनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक गुरुवारी (दि. २३ मार्च) संपन्न झाली. निवडणूक आयोगासमोर जाऊन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत (ईव्हीएम) विरोधकांचे आक्षेप पुन्हा एकदा लेखी स्वरूपात मांडण्याचा ठराव या बैठकीत संमत झाला. जगातील प्रत्येक मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते, या आपल्या जुन्या विचारावर विरोधक अद्यापही ठाम असल्याचा पुनरुच्चार या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला काँग्रेस समाजवादी पक्ष, जेडीयू, आप, सीपीआय, सीपीएम, शिवसेना (यूबीटी), बीआरएस, आययूएमएल या पक्षातील नेते आणि कपिल सिब्बल उपस्थित होते.
राज्यभरात ७ हजार ८९१ चिमण्यांची नोंद; निसर्गमित्र संस्थेच्या ऑनलाइन गणना मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद
निसर्गमित्र संस्थेतर्फे जागतिक चिमणी दिनानिमित्त महाराष्ट्रव्यापी ऑनलाइन चिमणी गणना मोहीम राबविण्यात आली. त्यात राज्यभरातील ३१, तर अन्य राज्यांतील दोन, अशा ३३ जिल्ह्यांतील नागरिकांनी सहभाग घेऊन सुमारे सात हजार ८९१ चिमण्यांची नोंद केल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी शुक्रवारी येथे दिली. मोहिमेत मध्य प्रदेश व कर्नाटकमधील पक्षीप्रेमींनीही सहभाग नोंदविला.गणना मोहिमेत सर्वाधिक चिमण्या सहा जिल्ह्यांमध्ये नोंदविण्यात आल्या. त्यात जळगाव एक हजार ७०३, पुणे एक हजार ३४७, नाशिक एक हजार १८३, सांगली ६१३, कोल्हापूर ५७५ आणि नगर येथे ३३१ चिमण्या नोंदविण्यात आल्या. ही गणना मोहीम तीन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी सकाळी साडेसहा ते साडेनऊ किंवा दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा या वेळेत किमान पंधरा मिनिटे वेळ देऊन करावयाची होती.
5G सेवेमध्ये Airtel ने रिलायन्स जीओला मागे टाकले
सध्या देशामध्ये Reliance Jio, Airtel आणि VI या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. यामध्ये जिओ आणि एअरटेलने आपले ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. एअरटेल कंपनी भारती एअरटेल आपल्या 5G इंटरनेट सेवेचा झपाट्याने विस्तार करत आहे. या स्पर्धेमध्ये कंपनीने शुक्रवारी देशातील २३५ नवीन शहरांमध्ये आपली अल्ट्रा-फास्ट ५जी सेवा Airtel 5G Plus लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.Airtel ने नवीन २३५ शहरांमध्ये 5G Plus लॉन्च केल्यानंतर आता देशभरातील ५०० शहरांमधील ग्राहकांसाठी एअरटेल ५जी नेटवर्क उपलब्ध असणार आहे. त्याच वेळी जीओला मागे टाकत देशातील ५०० शहरांमध्ये ५जी इंटरनेट सेवा सुरु करणारी पहिली टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल ही देशातील ५जी सेवा सुरु करणारी कंपनी आहे. Airtel ने हैदराबादमध्ये भारतातील पहिले लाइव्ह 5G नेटवर्क सादर केले होते. तसेच बंगळुरूमधील BOSCH सुविधेमध्ये भारतातील पहिले खाजगी 5G नेटवर्क देखील सादर केले होते.
ब्रिटनच्या संसदेत आता टिकटॉकवर बंदी
अल्पावधीत लोकप्रिय झालेले चिनी बनावटीचे सोशल मीडिया अॅप टिकटॉकवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने टिकटॉकसह अन्य अॅप गुगल प्लेस्टोरमधून हटवले होते. अशातच आता ब्रिटनच्या संसदेनेही टिकटॉकबाबत मोठा निर्णय घेतला आहे. संसदीय नेटवर्कमधून टिकटॉकला ब्लॉक करण्यात आलं आहे.
स्काई न्यूज ने दिलेल्या माहितीनुसार, हाउस ऑफ कॉमन्स आणि हाउस ऑफ लॉडर्सने घोषणा केली की, सायबर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या निर्णयाचं पालन करण्यात येणार आहे.
अमृतपाल सिंग, समर्थकांचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग
कट्टर धर्मोपदेशक व खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याचे समर्थक देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले होते असे संकेत त्याच्या एका साथीदाराकडून जप्त करण्यात आलेल्या काही संवेदनशील सामुग्रीतून मिळाले असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. दहशतवादी संघटनेत रूपांतर केली जाऊ शकेल अशी एक टोळी उभारण्यात मदत करण्यासाठी अमृतपाल हा व्यसनाधीन लोक आणि बदमाश माजी सैनिकांना लक्ष्य करत होता, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.अमृतपालच्या खासगी सुरक्षेत असलेल्या तेजिंदरसिंग गिल याला खन्ना पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत, तसेच त्याच्या मोबाइलच्या पृथ:करणातून ज्या अनेक गोष्टी उघड झाल्या, त्यातून हे लोक देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले असल्याचे दिसून येते, असे पंजाबचे पोलीस महानिरीक्षक सुखचैनसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अंतिम फेरीत पोहचण्यासाठी आज रंगणार महामुकाबला! मुंबई इंडियन्स यूपी वॉरिअर्सशी करणार दोन हात
महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत दिल्लीशी भिडणार आहे. मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे पाच सामने जिंकल्यानंतर सलग दोन सामने गमावले, पण शेवटचा सामना जिंकून एलिमिनेटर गाठले. सुरुवातीला हा संघ थेट फायनलपर्यंत पोहोचण्याच्या शर्यतीत आघाडीवर होता. त्याचवेळी, यूपी संघाला सलग सामने जिंकता आलेले नाहीत. शेवटच्या साखळी सामन्यातही या संघाचा दिल्लीकडून पराभव झाला होता. अशा स्थितीत दोन्ही संघांना अधिक अनुभवी आणि संतुलित संघ मैदानात उतरवायचा आहे.
‘ठाकरे आणि भाजप एकत्र येणार असतील तर, आम्हाला…’, शिंदेंच्या शिवसेनेने स्पष्टच सांगितलं
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरूवार 23 मार्चला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र विधिमंडळात चालत आहे. एकत्र येत असताना दोन्ही नेते एकमेकांसोबत हसत खेळत गप्पा-गोष्टी करत होते. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षानंतर फडणवीस आणि ठाकरे पहिल्यांदाच असे एकत्र दिसले, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडूनही या दोन्ही नेत्यांचे फोटो ट्वीट करण्यात आले आहेत.देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र विधिमंडळात येण्याबाबतच्या चर्चांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. अनेक वर्ष ठाकरे आणि फडणवीसांनी सोबत काम केलंय. जर ते पुन्हा एकत्र येणार असतील तर आम्हाला मान्य असल्याचं शिवसेना नेते कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं आहे.
मनमोहन सिंग यांचा अध्यादेश ‘फाडला’, त्यानेच राहुल गांधींचा घात केला!
आमदार आणि खासदार हे न्यायालयात दोषी आढळले, तर त्यांना या पदावर राहता येणार नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टाने 10 जुलै 2013 साली दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात तेव्हाच्या मनमोहन सिंग सरकारने अध्यादेश आणला, पण राहुल गांधींनी या अध्यादेशाला विरोध केला. एवढच नाही तर हा अध्यादेश फाडण्याची माझी आहे, हा अध्यादेश नॉन सेन्स आहे, असं खळबळजनक विधान राहुल गांधी यांनी केलं होतं. राहुल गांधींच्या या विधानामुळे त्यांच्याच मनमोहन सिंग सरकारची नाचक्की झाली होती.
आमिरच्या लेकाचं चित्रपट सृष्टीत पदार्पण
आमिरचा मुलगा जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यशराज बॅनरच्या ‘महाराजा’ या चित्रपटातून तो आपल्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाला सुरुवात करणार आहे.साऊथच्या सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी जुनैद खानला साईन केल्याचे बोलले जात आहे.तमिळचा हिट चित्रपट ‘लव्ह टुडे’च्या हिंदी रिमेकमध्ये आमिर खानचा मुलगा मुख्य भूमिका साकारू शकतो, अशी माहिती आहे.
महिला महाराष्ट्र केसरीचा थरार सुरू
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली. सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलातील पतंगराव कदम क्रिडा नगरीमध्ये या स्पर्धा होत असून 43 संघांमध्ये 260 हून अधिक महिला मल्ल या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. गुरुवारी हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. तर आज शुक्रवारी महिला महारष्ट्र केसरीची अंतिम लढत होणार आहे.महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन 50 किलो वजनी गटाच्या कुस्तीने झाले. रायगडची भूमिका खंडा विरुद्ध नागपूरच्या रुपाली मातवडकर या दोघींमध्ये लढत झाली. यामध्ये रुपालीने 7-0 ने भूमिकाला मात दिली. तर दुसरी कुस्ती अहमदनगरची दूर्गा शिरसाट आणि साताऱ्याची श्रेया मंडले यांच्यात झाली. यामध्ये श्रेयाने 12-0 ने विजय मिळवला.
SD Social Media
9850 60 3590