मेट्रोतून प्रवास करण्याचे पुणेकरांचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. येत्या रविवारी (6 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांना त्याच दिवशी मेट्रोतून सफर करता येणार आहे. एकाच वेळी पुणे आणि पिंपरीतील दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. दिवसभरात 13 तास मेट्रो पुणे आणि पिंपरीत धावणार असून, सध्या दर अर्ध्या तासाने त्यातून प्रवास करणे शक्य होणार आहे. याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (महामेट्रो) कडून लवकरच प्रसिद्ध केलं जाणार आहे.
उद्घाटनानंतर दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत मेट्रो सामान्य प्रवाशांसाठी धावणार. सात मार्चपासून सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत दर अर्ध्या तासाने धावणार आहे.
मेट्रोमधून प्रवास करत असताना नागरिकांना पहिल्या तीन स्थानकांपर्यंत 10 रुपये तिकिटाचे असणार आहे. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या स्थानकासाठी 20 रुपये तिकीट दर असणार आहेत. यामध्ये वनाझ ते आयडियल कॉलनी या प्रवासासाठी 10 रुपये द्यावे लागणार. वनाझ ते एसएनडीटी किंवा गरवारे महाविद्यालयापर्यंतच्या प्रवासासाठी 20 रुपये तिकीट पिंपरी ते भोसरी (नाशिक फाटा) प्रवासासाठी 10 रुपये तिकीट. पिंपरी ते फुगेवाडी प्रवासासाठी 20 रुपये तिकीट प्रवासी क्षमता मेट्रोच्या एका डब्यात 325 प्रवासी क्षमता सध्या मेट्रो तीन डब्यांची; 975 प्रवासी प्रवास करु शकणार.एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे.