आयपीएलच्या 15 व्या ( IPL 2022) मोसमातील 38 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्जने त्यांचा 11 धावांनी पराभव करून स्पर्धेतील चौथा विजय मिळवला.
मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नईला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धावांची गरज होती. महेंद्रसिंह धोनीने चेन्नईला जिंकवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र तो अपयशी ठरला.
पंजाबने चेन्नईला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 176 धावाच करता आल्या.
पंजाब प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, ऋषि धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, संदीप शर्मा आणि अर्शदीप सिंह.
चेन्नई प्लेइंग इलेव्हन : रवींद्र जडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सेंटनर, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी आणि महेश थीक्षाना.