आज दि.१३ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला,
कर्नलसह तीन जवान शहीद

मणिपूरमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कारतील कर्नल, त्यांची पत्नी व मुलाचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जवान देखील शहीद झाले आहेत. मागील अनेक वर्षांमधील या क्षेत्रात झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. ही घटना शनिवार सकाळी १० वाजता मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील म्यानमार सीमेजवळ घडली. आसाम रायफल्सच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

त्रिपुरामध्ये अशी कोणती घटनाच
घडली नाही : फडणवीस

अमरावतीमधील बंदला लागलेल्या हिंसक वळणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्रिपुरामध्ये अशी कोणती घटनाच घडली नसल्याचं सांगितलं आहे. त्रिपुरामध्ये मशीद जाळण्यात आल्याच्या प्रकरणाचा निषेध म्हणून हे मोर्चे काढले जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, अमरावतीमधील एकूणच घटनाक्रम अस्वस्थ करणारा आहे. पहिल्यांदा सर्वांना विनंती करतो की अमरावतीत शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार करू नये. पण ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले, हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतंय. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही, त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणं अत्यंत चुकीचं आहे.

तर मी माझा पद्मश्री पुरस्कार
परत करून माफी मागेन : कंगना

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. “या मुलाखतीत स्पष्टपणे सांगण्यात आले की स्वातंत्र्यासाठी पहिले संघटित युद्ध हे १८५७ मध्ये लढले गेले. मला १८५७ ची माहिती आहे पण १९४७ मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहित नाही. जर कोणी या प्रकरणावर मला माहिती दिली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन… कृपया मला मदत करा,” असे कंगना म्हणाली आहे.

प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी
दिल्‍लीत लॉकडाऊन लावा

न्यायालयाने दिल्लीतील वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्याबद्दल विचारले आणि शहरात दोन दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याची सूचना केली. सरन्यायाधीश रमणा म्हणाले, ‘तुम्ही एकटे शेतकरीच जबाबदार असल्यासारखे भासवत आहात. मात्र ते ४० टक्के आहे. दिल्लीतील लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले कुठे आहेत? फटाक्यांचे काय? वाहनांचे प्रदूषणाचे काय?”

रझा अकादमी ही दहशतवादी
संघटना : नितेश राणे

महाराष्ट्रातील काही भागात घडलेल्या अनेक हिंसक घटना आणि दंगलींमागे रझा अकादमी ही दहशतवादी संघटना आहे. प्रत्येक वेळी ते शांतता भंग करतात सर्व नियम पायदळी तुडवतात आणि बसून राहतं, बघत बसतं. सरकारने एकतर यांच्यावर बंदी आणावी, अन्यथा महाराष्ट्राच्या आम्ही भल्यासाठी त्यांना संपवू.” असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे

उत्तर प्रदेशात महिलांची सुरक्षा
आवश्यक : प्रियंका गांधी

प्रियंका गांधी य़ांनी ट्विटर केले की, “देशाचे गृहमंत्री दागिने घालून निघण्याचा जुमला देतात, परंतु रोज कोणत्या प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागते हे फक्त यूपीच्या महिलांनाच माहीत आहे. म्हणूनच ‘मी एक मुलगी आहे, मी लढू शकते’ हे उत्तर प्रदेशात आवश्यक आहे. जेणेकरून महिलांचा राजकारणात आणि सुरक्षेशी संबंधित धोरणे बनवण्यात सहभाग वाढेल.”

हबीबगंज स्टेशनचे नाव बदलून
राणी कमलापती ठेवणार

मध्य प्रदेशात १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी आदिवासी गौरव दिन साजरा केला जाईल. यावेळी पंतप्रधान मोदी भोपाळमध्ये पोहोचून जनसभेला संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून बांधण्यात आलेल्या हबीबगंज या पहिल्या रेल्वे स्थानकाचेही उद्घाटन ते करणार आहेत. दरम्यान, शिवराज सिंह चौहान सरकारने केंद्राला पत्र लिहून हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव आदिवासी राणी कमलापती यांच्या नावावर ठेवण्याची मागणी केली होती. राणी कमलापती या भोपाळच्या शेवटच्या गोंड राणी होत्या.

दोन कसोटी साठी
श्रेयस आणि कृष्णा यांना संधी

न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरसह वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि यष्टिरक्षक केएस भरत या नव्या चेहऱ्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीत खेळणार नसल्यामुळे उपकर्णधार अजिक्य रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे.

एसटी कामगारांच्या संपात फूट,
826 बसेस रस्त्यावर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चार दिवसानंतर पहिली एसटी बस धावली आहे. मुंबई सेंट्रलमधून पहिली एसटी साताऱ्याच्या दिशेने रवाना झाली. तर 826 एसटी रस्त्यावर धावत असल्याचं एसटी प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या संपात फूट पडल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. राज्यातील काही भागात एसटी सेवा सुरू झाली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.