राज्यात 43 हजार 697 नवे कोरोना रुग्ण आढळले

महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या पुन्हा 40 हजारांच्या वर गेली आहे. बुधवारी राज्यात 43 हजार 697 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 46 हजार 591 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 69 लाख 25 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, राज्यात बुधवारी ओमिक्रॉनच्या 214 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 158, मुंबईतील 31 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2074 वर पोहोचली आहे. तर, 1091 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण जसजसे कमी होऊ लागले तसतसे चाचण्यांमध्येही मोठय़ा प्रमाणात घट होऊ लागली आहे. तिसऱ्या लाटेने उच्चांक गाठला त्यावेळी मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या ही 68 ते 70 हजारांवर गेली होती. परंतु आता हे प्रमाण थेट 47 हजारांपर्यंत खाली आले आहे.
बुधवारी राज्यात 43 हजार 697 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 46 हजार 591 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 69 लाख 25 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, राज्यात बुधवारी ओमिक्रॉनच्या 214 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 158, मुंबईतील 31 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2074 वर पोहोचली आहे. तर, 1091 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.