साडेचार वर्षांची मुलगी उकळत्या पाण्यात पडली, पाच दिवस मृत्यूशी झुंज

पश्चिम बंगालमध्ये एक अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे. उद्यानात खेळत असलेली साडेचार वर्षांची मुलगी अचानक उद्यानातून बाहेर आली आणि समोरील मिठाईच्या दुकानाकडे गेली आणि तिथल्या उकळत्या पाण्यात पडली. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिच्यावर पाच दिवस उपचार सुरु होते. मात्र तिची मृत्यूशी झुंज सुरु होती. पाच दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. ही घटना पूर्व मिदनापूरमधील कोलाघाट पोलीस ठाण्याच्या मेचेडा चिल्ड्रन पार्क भागातील आहे. विद्यासागरपल्ली, शांतीपूर येथे तिचे घर आहे. तिच्या मृत्यूनंतर स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी मुलीच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या मिठाई दुकानाची तोडफोड केली.

पूर्व मिदनापूरमधील कोलाघाट पोलीस ठाण्याच्या मेचेडा चिल्ड्रन पार्क भागातील एका मिठाईच्या दुकानासमोर उकळत्या पाण्याचे भांडे पडले होते. त्यात भांड्यातील उकळत्या पाण्यात चिमुकली चुकून पडली. दुकानमालकाने तिच्याकडे लक्ष न गेल्याचे नाटक केले. नंतर गंभीर अवस्थेत भाजलेल्या मुलीला स्थानिक लोकांनी रुग्णालयात नेले, मात्र तिचा प्राण वाचवता आला नाही. गुरुवारी तिचा मृत्यू झाल्यानंतर परिसरातील लोक आणि नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक झाला.

दुकानमालकाने आपल्या मिठाई दुकानासमोर उकळते पाणी ठेवले होते. खेळता खेळता साडेचार वर्षांची मुलगी चुकून तेथे पडली. मुलीचे वडील अर्णब गोस्वामी हे व्यवसायाने ड्रायव्हर आहेत. दुकानात एवढी जागा असूनही दुकानदाराने उकळत्या पाण्याचे भांडे बाहेर ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केली आहे. संतापजनक बाब म्हणजे, उकळत्या पाण्यात पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी दुकानातील कोणीही पुढे आले नाही. मुलगी पडल्याचे पाहून दुकानदाराने तिला उचलण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे बराच वेळ उकळत्या पाण्यात राहिल्याने मुलगी गंभीररित्या भाजली.

31 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता तीन मुले उद्यानासमोर खेळत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ती मुलगी अचानक त्या मिठाईच्या दुकानातील भांड्यात भरलेल्या उकळत्या पाण्यात पडली. तिला सुरुवातीला तामलुक जिल्हा रुग्णालयात आणि नंतर कोलकाता येथील पीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 4 जानेवारीच्या रात्री मुलीचा मृत्यू झाला. तिच्यावर मागील पाच दिवस उपचार सुरु होते. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.