ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्क्टिका खंडातील मोठ्या हिमनगांचे तुकडे होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. आतादेखील अशाच एका हिमनगाचा तुकडा अंटार्क्टिकापासून विलग झाला आहे. जगातील सगळ्यात मोठ्या हिमखंडाचा एक तुकडा अंटार्क्टिकातून वेडेल समुद्रात पडला आहे. हा बर्फाचा तुकडा 170 किलोमीटर लांबी आहे तसंच 25 किलोमीटर रुंद आहे. या तुकड्याच्या आकारावरुन असं अनुमान काढलं जातंय की तो तुकडा मुंबईच्या सातपट आहे तसंच न्यूयॉर्क बेटापेक्षा मोठा आहे. हिमखंडाचा हा तुकडा पडल्याने समुद्रतटीय शहरांना धोका असल्याचं बोललं जातंय.
युरोपियन स्पेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, हा बर्फाचा तुकडा अंटार्क्टिकामधील रॉनी आईस शेल्फच्या पश्चिमेच्या बाजूने तुटला आहे जो सध्या वेडेलच्या समुद्रात तरंगत आहे. संशोधकांनी हा हिमखंडाला A 76 असं नाव दिलं आहे. या हिमखंडाचा आकार जाणून घेण्यासाठी सॅटेलाईट मेजरमेंट टेक्नोलॉजीची मदत घेण्यात आलीय.
अंटार्क्टिकाचं तापमान ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस वाढतंय. त्यामुळे बर्फही वेगाने वितळतोय. हिमनद्याही वितळायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत पाण्याची पातळी वाढतीय. ज्यामुळे हजारो शहरांना धोका निर्माण झालाय.
ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा अधिकच तीव्र बनत चाललाय. ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकतर बर्फ वितळत चाललाय अशा परिस्थितीत समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे हजारो समुद्रतटीय शहरांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अंटार्क्टिका वितळलेल्या बर्फाचं परिणाम खूप मोठा आहे. संशोधकांच्या अभ्यासानुसार, 1980 पासून समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत चाललीय. ही वाढ सरासरी 9 इंचाने झाल्याचं मत संशोधकांनी नोंदवलंय. अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडमधील बर्फाचं वितळण्याचं मोठं प्रमाण हे जास्त आहे.
अंटार्क्टिकाची आईसशीट वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे वितळत आहे त्यामुळे हा हिमखंड वेगळा झाला आहे. येत्या काही दिवसांत या हिमखंडाचे तुकडे होतील.