पाऊले चालती पंढरीची वाट! गजानन महाराजांची पालखी निघाली विठुरायाच्या भेटीला
कोरोना महामारीमुळे पंढरीची वारी निघाली नव्हती. मात्र, सर्वत्र लसीकरण झाल्यामुळे सर्व काही पूर्ववत होत आहेत. कोरोनामुळे 2 वर्षानंतर गजानन महाराजांची पालखी अकोल्यात दाखल झाली. शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. टाळ मृदुंगच्या गजरामुळे शहरात दाखल झाल्याने भक्तांमध्ये उत्साह आणि आनंदाच वातावरण दिसून आले.
शहरामध्ये श्रींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली होती. या पालखीच्या सोहळ्यानिमित्त अकोला शहरात चौका-चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले जात होते. स्वागतासाठी जागोजागी रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी वारकऱ्यांना पेयजल व खाद्यपदार्थांचे वाटप देखील होते.
‘विठूनामाचा गजर आणि गण गण गणात बोते’चा नामघोष करत श्री. संत गजानन महाराजांची पालखी 6 जूनला सोमवारी सकाळी 7 वाजता मोठ्या थाटात विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. 2 वर्षांनंतर हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले होते. श्रींची पालखी श्री शेत्र पंढरपूर येथे 8 जुलैला पोहोचेल, अशी माहिती वारकऱ्यांकडून देण्यात आली.
झूम कॉलवर 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या विशाल गर्ग यांच्या अडचणीत वाढ
कोरोना काळात लोकांना पैशांची अत्यंत गरज होती. लोकांच्या नोकऱ्या जात होत्या. अशा निराशाजनक वातावरणात एका घटनेने सर्वांचच लक्ष वेधल होतं. झूम कॉलवर 900 कर्मचाऱ्यांना Better.com चे सीईओ विशाल गर्ग यांनी नोकरीवरुन काढून टाकलं होते. मात्र त्याच विशाल गर्ग यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत.
कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने सीईओ आणि कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माजी कर्मचाऱ्याने आरोप केला आहे की कंपनी आणि गर्ग यांनी डिजिटल मॉर्गेज फर्मच्या आर्थिक संभावना आणि कामगिरीबद्दल गुंतवणूकदारांना दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. कंपनीची माजी कर्मचारी सारा पियर्स हिने हा गुन्हा दाखल केला आहे. सारा यांनी सॉफ्टबँक-सपोर्टेड कंपनीमध्ये सेल्स आणि ऑपरेशन्ससाठी व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम केले आहे.
अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना राज्यसभेसाठी मतदान करता येणार? कोर्टाने राखून ठेवला निकाल
राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची मतांच्या गणिताची जुळवाजुळव चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत. त्यांनी आपल्याला राज्यसभेत मतदान करता यावं, या मागणीसाठीचा अर्ज कोर्टात दाखल केला होता. त्यांच्या या अर्जावर आज कोर्टात सुनावणी झाली. यावेळी ईडीच्या वकिलांनी मलिक आणि देशमुख यांच्या अर्जाला जोरदार विरोध केला. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर कोर्टाने याबाबतचा निकाल आता राखून ठेवला आहे. न्यायाधीश राहुल रोकडे याबाबतचा निकाल उद्या पहिल्या सत्रात जाहीर करणार आहेत. त्यामुळे मलिक आणि देशमुख यांना राज्यसभेत मतदान करता येणार का याबाबतचा सस्पेन्स वाढणार आहे. विशेष म्हणजे येत्या 10 जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. त्याआधी म्हणजे उद्या याबाबतचा निकाल लागणार आहे. हा निकाल देशमुख आणि मलिकांच्या बाजूने लागला तर महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळणार आहे.
टीम इंडियाला धक्का, केएल राहुल सीरिजमधून बाहेर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. या सीरिजसाठी कर्णधार म्हणून निवडण्यात आलेला केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. केएल राहुल संपूर्ण सीरिज खेळणार नसल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. गुरूवारी दिल्लीमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-20 पासून भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजची सुरूवात होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सीरिजसाठी केएल राहुलला कर्णधार तर ऋषभ पंतला उपकर्णधार करण्यात आलं, त्यामुळे आता राहुलच्या गैरहजेरीमध्ये ऋषभ पंत टीमचं नेतृत्व करेल, असंही बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी हायहोल्टेज ड्रामा
औरंगाबादेत शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. पण या सभेच्या आधीच भाजपच्या नेत्यांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. पण, वेळीच पोलिसांनी भाजपच्या नेत्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी भाजपच्या नेत्यांनी एका 75 वर्षांच्या आजीला सुद्धा सोबत घेतले होते. त्यांनीही पोलिसांनी अटक केली.
भाजप आमदार पोहोचले मुंबईत, बैठकीला फडणवीस राहणार गैरहजर!
राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीने आपल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये हलवलं आहे. तर आता भाजपचे आमदारही मुंबईमध्ये दाखल होत आहे. आज भाजपची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. पण कोरोनाची लागण झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस या बैठकीला गैर हजर राहणार आहे.
राज्यसभा निवडणुकीची आता दोन दिवस उरले आहे. महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर भाजपचे आमदार आता मुंबईत दाखल होत आहे. भाजप आमदारांची ताज प्रेसिडेंट इथं बैठक होणार आहे. या बैठकीला मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार नाहीत.
एकनाथ खडसेंना सर्वात मोठा दिलासा, ईडीच्या घर खाली करण्याच्या आदेशाला कोर्टाकडून स्थगिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसेंना ईडीने घर खाली करण्याची नोटीस दिली होती. ईडी अधिकारी खडसेंच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याच्या तयारीत होते. पण त्याआधीच खडसेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. अखेर दिल्ली हायकोर्टाने खडसेंना मोठा दिलासा आहे. दिल्ली हायकोर्टाने खडसेंच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. एकनाथ खडसेंचे वकील मोहन टेकवडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. मोहन टेकवडे यांनी ईडीला पत्र लिहून दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या आदेशाबद्दल माहिती दिली आहे.
मूसेवाला हत्या प्रकरणात सौरभ महाकाळला पुणे पोलिसांनी केली अटक
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आले होते. अखेरीस या प्रकरणात सौरभ महाकाळ या पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात एकूण आठ आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नाव समोर आली.
रस्तेबांधणीत NHAI चा विश्वविक्रम; 105 तासांत बांधला अमरावती ते अकोल्यादरम्यानच 75 KM काँक्रीट रस्ता
धडाकेबाज कामासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्तेबांधणीच्या कामाने आणखी एक विक्रम केला आहे. ‘नॅशनल हायवेज असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (NHAI) कन्सल्टंट्सनी सलग 75 किलोमीटर्स लांबीचा बिटुमिनस काँक्रीट रस्ता 105 तास आणि 33 मिनिटांच्या कालावधीत बांधून पूर्ण केला. या विक्रमाची नोंद ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53वरच्या अमरावती ते अकोला या शहरांदरम्यानचा रस्त्याचा भाग (सिंगल लेन) यात बांधण्यात आला. नितीन गडकरींनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करून या कामाशी संबंधित सर्वांचं अभिनंदन केलं आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
या रस्त्याचं काम 3 जून 2022 रोजी सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी सुरू झालं आणि ते 5 जून रोजी सायंकाळी पाच वाजता संपलं, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली.
आज महाराष्ट्रात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस; २७ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्यानंतर मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं पिवळा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. संबंधित जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही तासांत या जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
SD Social Media
9850 60 3590