आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांची ‘या’ शेअर्सवर असेल नजर

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर शेअर बाजार आज खुला होत आहे. येथे आम्ही असे शेअर्स सांगत आहोत जे आज बातम्यांमध्ये राहतील आणि ज्यावर बाजाराची नजर असेल.

GAIL (India)

सरकारी मालकीच्या GAIL ने आज माहिती दिली की NCLT ने ONGC त्रिपुरा पॉवर कंपनी लिमिटेड (OTPC) मधील इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (L&FS) चे 26 टक्के स्टेक घेण्यास मान्यता दिली आहे. GAIL ने या निवेदनात पुढे म्हटले आहे की, हा भाग IL&FS ग्रुप कंपनी IL&FS Energy Development Company Ltd (EDCL) आणि L&FS Financial Services Ltd (IFIN) कडून विकत घेतला जाईल.

SUN TV Network

सन टीव्ही नेटवर्क कंपनीची आर्थिक वर्ष 22 च्या दुसऱ्या तिमाहीत नफ्यात चांगली वाढ झाली आहे. वर्षभराच्या आधारावर, FY22 च्या दुसर्‍या तिमाहीत कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या दुसर्‍या तिमाहीत 335.02 कोटींवरून 395.55 कोटी इतका वाढला आहे. तर FY21 च्या दुसऱ्या तिमाहीत उत्पन्न 768.69 कोटींवरून 848.67 कोटींवर पोहोचले आहे.

Divis Laboratories

FY22 च्या दुसर्‍या तिमाहीत वार्षिक आधारावर नफा FY21 च्या दुसर्‍या तिमाहीच्या तुलनेत 519.59 कोटी वरून 606.46 कोटी झाला आहे. तर कमाई FY21 च्या दुसर्‍या तिमाहीच्या तुलने 1749.3 कोटी वरून रु. 1987.51 कोटी झाली आहे.

Dhanlaxmi Bank

आर्थिक वर्ष 22 च्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचा नफा सुमारे 74 टक्क्यांनी घसरून 3.66 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचा नफा 14.01 कोटी रुपये होता. तर व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 243.97 कोटी रुपयांवरून 229 कोटींवर आले आहे.

Grasim Indstries

कंपनीच्या गुजरात स्थित विलायत युनिटने यशस्वीपणे काम सुरू केले आहे. त्याची उत्पादन क्षमता प्रतिदिन 150 टन आणि प्रति वर्ष 50,000 टन आहे. हे युनिट क्लोरोमेथेन तयार करेल. या युनिटमधून कंपनीला 400 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

NMDC

NMDC ने लोहखनिजाच्या (Iron Ore) किमती निश्चित केल्या आहेत. एकरकमी खनिजाची किंमत 5,950 रुपये प्रति टन आणि Fines 4760 रुपये प्रति टन निश्चित करण्यात आला आहे.

SJVN

कंपनीला पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशनकडून 100-MW ग्रिड कनेक्टेड सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 545 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे.

Andhra Petrochemicals

कंपनीने आर्थिक वर्ष 22 च्या दुसऱ्या तिमाहीत 86.48 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. जो गेल्या वर्षीच्या दुसर्‍या तिमाहीत 6.9 कोटी होता. त्याच वेळी, कंपनीचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 133.72 कोटी रुपयांवरून 242.65 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

Suven Pharmaceuticals

वार्षिक आधारावर FY22 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 74.08 कोटींवरून रु. 96.98 कोटी झाला आहे, तर उत्पन्न रु. 237.38 कोटींवरून रु. 300.98 कोटींपर्यंत वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.