जेईई मेन परीक्षा 2021 च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी सुरु झाली आहे. जेईई मेन परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टींग एजन्सीची वेबसाईट jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर अर्ज करु शकतात. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छितात ते 12 जुलैपूर्वी अर्ज दाखल करु शकतात.
जेईई मेन परीक्षा 2021 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे. चौथ्या सत्राची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सीनं याबाबात नोटिफिकेशन जारी केलं आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत. एप्रिल आणि मे सत्रातील अर्ज केलेले सत्र, प्रवर्ग आणि विषय इत्यादी माहिती अद्यावत करावी लागणार आहे.
जेईई मेन परीक्षा 2021 सेशन 4 साठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील स्टेपचा वापर करणं आवश्यक आहे.
स्टेप 1 नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या जेईई मेन परीक्षा वेबसाईटला भेट द्या
स्टेप 2 जेईई मेन परीक्षा 2021 या दिलेल्या लिंकवर क्लिक करा
स्टेप 3 नवीन होम पेज ओपन होईल त्यावर विद्यार्थी ईमेल आणि मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करु शकतात
स्टेप 4 लॉगीन डिटेल्स मिळाल्यानंतर विद्यार्थी अर्जातील सर्व माहिती भरुन परीक्षा शुल्क जमा करु शकतात
स्टेप 5 अर्ज भरल्यानंतर डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट काढून सोबत ठेवा
नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे.