जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरातील व्ही टेक इंडस्ट्रीज इंडिया या कंपनीवर दरोडा टाकण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेत कंपनीच्या सुरक्षा भिंतीवरून 7 पुरुष व 2 महिला दरोडेखोरांनी आतामध्ये प्रवेश करत तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल लुटला. यामध्ये दरोडेखोरांनी कंपनीच्या सुरक्षा रक्षलाही मारले आहे. या प्रकरणी सध्या दोन महिला आणि सहा जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.
सात पुरुष आणि दोन महिला अवैध मार्गाने आत घुसले
मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरात एक व्ही टेक इंडिस्ट्रीज इंडिया ही कंपनी आहे. या कपंनीमध्ये स्पेअर पार्टचे उत्पादन होते. मात्र, यावेळी कंपनीत एकूण सात पुरुष आणि दोन महिला अवैध मार्गाने घुसले. त्यांनी कंपनीच्या आतमध्ये प्रवेश करत आधी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तसेच त्याच्या डोळ्यात मिर्चीची पूडही टाकली.
त्यानंतर या दरोडेखोरांनी तांबे, पितळ या धातूचे टर्मिनल, लग्ज, वायरिंग हर्णेस असे स्पेअर पार्ट्स पळवले. तसेच सुरक्षा रक्षकांचे एकूण तीन मोबाईल फोन चोरी केले. या दरोड्यामध्ये त्यांनी एकूण 25 लाख 87 हजार 247 रुपये किंमतीचा मुद्देमाल लुटून नेला.
दरम्यान दरोडा टाकणाऱ्या टोळीला म्हाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आपल्या कारवाईमध्ये दोन महिला आणि सहा तरुणांना अटक केली आहे. ह्या दरोडेखोरांनी तांबे, पितळ या धातूचे एकूण 25,87,247 लाख किमतीचे स्पेअर पार्ट दरोडा टाकून लुटले. ह्या प्रकरणी चाकण म्हाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल 33 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अद्याप दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.