T20 World Cup : भारताच्या ओपनरना पाकिस्तानी बॉलरकडून धोका, पहिल्याच ओव्हरमध्ये करतो हल्ला!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या महामुकाबल्याला आता अवघ्या काही वेळात सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची कामगिरी ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यावर अवलंबून आहे. पॉवर प्लेमध्ये जास्त रन करण्याचा या दोघांचा प्रयत्न असेल. पण या दोघांना पाकिस्तानच्या एका फास्ट बॉलरपासून सावध राहावं लागणार आहे. डावखुरा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी बड्या बड्या ओपनरची बोलती बंद करू शकतो. फक्त 21 वर्षांच्या या ओपनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. भारतालाही त्याच्यापासून सावध राहावं लागणार आहे.
शाहिन आफ्रिदीकडे 19 टेस्ट, 28 वनडे आणि 30 टी-20 मॅचचा अनुभव आहे. पाकिस्तानचे अनेक चाहते शाहिनची तुलना वसीम अक्रम आणि मोहम्मद आमीरशी करतात. पाकिस्तान सुपर लीगमध्ये मिकी आर्थर यांनी शाहिनची तुलना ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कशी केली होती. एवढ्या कमी अनुभवामध्ये शाहिन आफ्रिदीने आपल्या जलद आणि अचूक बॉलिंगने अनेक बड्या खेळाडूंना हैराण केलं.
भाषण सुरू असतानाच एकाने राज्यपालांच्या श्रीमुखात भडकावली
राज्यपालांचं व्यासपीठावर भाषण सुरू असतानाच एका इसमाने सर्वांसमोर त्यांच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इराणमधील विभागीय राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यानच हा प्रकार घडला. राज्यपाल भाषण करण्यासाठी स्टेजवर गेले. त्यांनी भाषण सुरू केलं. तेवढ्यात एक व्यक्ती स्टेजवर आली आणि त्याने थेट राज्यपालांच्या श्रीमुखात भडकावली.स्टेजवर जाऊन राज्यपालांना कानशिलात लगावण्यामागचं कारण हे काहीसं विचित्र आहे. या व्यक्तीच्या पत्नीला पुरुष कर्मचाऱ्याकडून कोरोनाची लस टोचून घ्यावी लागली. पत्नीला लस टोचण्यासाठी महिला कर्मचारी न मिळाल्याचा राग मनात धरून त्याने थेट राज्यपालांवर हल्लाबोल केला. या घटनेमुळे राज्यपालदेखील क्षणभर हडबडले मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानचा संघ भारताला
नमवेल : इमरान खान
आज फक्त आणि फक्त भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची चर्चा सर्वत्र आहे. दुबईच्या मैदानावर थोड्या वेळेत दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत.
जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, या सामन्यापूर्वी इम्रान खानच्या कार्यालयातून एक निवेदन जारी करण्यात आले होते. यामध्ये भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानी संघाच्या विजयाची आशा व्यक्त करण्यात आली आहे. इम्रान खान यांनी निवेदनात म्हटले, ”या संघात भारताला हरवण्याची प्रतिभा आहे. इंशाअल्लाह पाकिस्तान संघ या सामन्यात भारतीय संघाला नक्कीच पराभूत करेल.”
कोणत्याही शहरातून मतदान
करता येणारे मशीन तयार
मतदार नोंदणी कुठेही झाली असली आणि मतदानाच्या दिवशी देशातील मतदार कोणत्याही शहरात असेल तरीही बोटांचे ठसे आणि आधार लिंक्ड इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीमुळे मतदानाचा हक्क बजावता येणे शक्य होईल, असे मतदान यंत्र (ईव्हीएम) अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील आनंद मिश्रीकोटकर या युवकाने तयार केले आहे. हे यंत्र पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यात वापरण्यात यावे, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या
परीक्षेत पुन्हा गोंधळ
आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ सुरूच आहे. आज मुंबई, पुणे, नाशिक येथील आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. अनेक विद्यार्थ्यांना पेपर मिळण्यास उशीर झाल्याचं समोर आलंय. तसेच मुलांच्या आसनव्यवस्थेही घोळ झाला आहे. पुण्यात एका केंद्रावर परीक्षेची वेळ होऊनही विद्यार्थांना आसन क्रमांक न मिळाल्याचा आरोप करत विद्यार्थांनी गोंधळ घातला आहे. परीक्षा केंद्रांवर सर्व अधिकारी उडवा-उडवीची उत्तर देत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. नाशिकमध्ये निम्म्या विद्यार्थांना पेपरच मिळालेच नसल्याचं समोर आलंय.
मी भाजपचा खासदार ईडी
इकडे येणार नाही : संजय पाटील
सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात भाजपा खासदार संजय काका पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात स्टेजवरून बोलताना संजय काका पाटील यांनी आर्थिक गोष्टींवर मिश्किलपणे बोलताना ईडीची कारवाई आणि भाजपाचं संरक्षण या आशयावर केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. “माझ्यामागे ईडी लागणार नाही. मी भाजपाचा खासदार आहे. त्यामुळे ईडी इकडे येणार नाही”, असं संजय काका पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावर राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून देखील आक्षेप घेतला जात आहे.
प्रभाकर साईल यांच्या आरोपांना
योग्य उत्तर देईल : वानखेडे
केपी गोसावीचा आर्यन खानसोबत सेल्फी व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला इंडिया टूडेशी बोलताना केला आहे. त्याच्या या आरोपांना समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केपी गोसावीचा सहकारी प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, “मी प्रभाकर साईल यांच्या आरोपांना योग्य उत्तर देईल.” वेळ आल्यानंतर प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांना योग्य वेळ आल्यानंतर प्रत्युत्तर देईल, असं समीर वानखेडे यांनी म्हटलंय.
काँग्रेसची आघाडी म्हणजे,
डिपॉझिट जप्त करण्यासाठी
राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये काँग्रेसोबत युती तुटल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर लालू म्हणाले की, काँग्रेसची आघाडी म्हणजे काय आहे? आम्ही हरण्यासाठी काँग्रेसवर सर्व काही सोडून देतो? डिपॉझिट जप्त करण्यासाठी देतो? काँग्रेसचे बिहारचे प्रभारी भक्त चरणदास यांनी म्हटले की, २०२४ मध्ये राज्यातील सर्व ४० लोकसभा जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल. राजद आम्हाला मान नाही देऊ शकत तर मग आम्ही त्यांना कसा सन्मान देणार.
वानखेडेंची नोकरी की, मलिकांचे
मंत्रिपद जातयं हे पाहुया
राष्ट्रीयस्तरावरील यंत्रणांकडून राज्यात कारवाया होत असल्यातरी त्यातून शरद पवार यांच्या कुटुंबाला अथवा कुणालातरी त्रास देण्याचा उद्देश नाही. या यंत्रणा पूर्णत: स्वतंत्र असून, त्यांच्या कारवाईंमध्ये केंद सरकारच्या हस्तक्षेपाचा संबंधच येत नसल्याचं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच, “ अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाईल, त्यांना तुरूंगात पाठवू या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अल्पसंख्याक कल्याणमंत्री नवाब मलिक यांच्या इशाऱ्याबाबत आठवलेंनी वानखेडेंची नोकरी की, मलिकांचे मंत्रिपद जातयं हे पाहुया असे आव्हानच दिले.
स्मार्ट वॉच ठेवणार सरकारी
कर्मचाऱ्यांवर नजर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी घोषणा केली आहे की, राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांना स्मार्ट वॉच घालावे लागतील जे कार्यालयीन वेळेत त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतील. तसेच उपस्थिती चिन्हांकित करण्यासाठी एक साधन म्हणून काम करतील.
“राज्यातील सर्व सरकारी अधिकारी स्मार्ट वॉच घालतील जे कार्यालयीन वेळेत त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतील. तसेच उपस्थिती चिन्हांकित करण्यासाठी एक साधन म्हणून काम करतील,” शनिवारी सोहना येथील सर्मथला गावात ‘विकास’ रॅलीदरम्यान खट्टर यांनी जाहीर केले.
SD social media
9850 60 3590