रशिया आणि यूक्रेनमधील युद्धामुळे दोन्ही देशांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. दोन्ही देशांचे हजारो सैनिक मारले गेले. यूक्रेनमधील सर्वसामान्य नागरिकांनाही या युद्धात प्राण गमवावे लागले. संपूर्ण जगावर या युद्धाचा परिणाम पाहायला मिळतोय. अशावेळी रशिया यूक्रेनमधील युद्ध मिटण्याबाबत एक आशेचा किरण आता समोर आलाय. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलदिमीर झेलेन्स्की यांनी शांती वार्ताबाबत मोठं वक्तव्य केलंय. यूक्रेन रशियासोबत करार करण्यास तयार आहे.
यूक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी सांगितलं की, आम्ही रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चेसाठी तयार आहोत. तसंच वाटाघाटीस नकार देणं म्हणजे तिसऱ्या महायुद्धाचा इशारा होय, असंही झेलेन्स्की म्हणाले. दरम्यान, रशियाकडून यूक्रेनवर सातत्याने हल्ले सुरुच आहेत. रशियन सैन्य यूक्रेनच्या रहिवासी भागाला टार्गेट करत आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे यूक्रेन उद्ध्वस्त झालाय. असं असलं तरी यूक्रेनी सैन्य हार मानायला तयार नाही. ते रशियन सैन्याला खंबीरपणे तोंड देत आहेत.
रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेलं हे युद्ध कधी संपेल हे सांगणं कठीण आहे. या युद्धात रशियाला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.
यूक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी दावा केलाय की, 20 मार्च म्हणजे आजपर्यंत 14 हजार 700 रशियन सैनिक मारले गेले. तसंच रशियाची अनेक शस्त्रेही नष्ट झाल्याचा दावा करण्यात आलाय. त्यात 118 रशियन हेलिकॉप्टर, 96 विमाने, 476 रणगाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, दोन्ही देशांत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, युद्धबंदीबाबत कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. तर संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार यूक्रेनमधील युद्धामुळे आतापर्यंत 65 लाखापेक्षा अधिक लोकांना देश सोडला आहे.
रशियन सैन्य हळू हळू मारियुपोल शहरावर नियंत्रण मिळवत आहे. रशियाच्या सान्यानं मारियुपोलच्या मध्यवर्ती ठिकाणांपर्यंत शिरकारव केला आहे. मारियुपोलमधील स्थिती बिघडत असून यूरोपिय देशांकडे मदतीची याचना करण्यात आली आहे. मारियुपोलमध्य लहान मुलं आणि वयस्कर नागरिकांना मारलं जात असून शहर नष्ट करण्यात येत असल्याचा व्हिडिओ स्थानिक अधिकारी मायकल वर्शनिन यांनी जारी केला आहे.
यूक्रेनमध्ये रशियाकडून होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 10 रहिवशी ठिकाणांपैकी 8 ठिकाणांहून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. मारियुपोल सिटी काऊन्सिलनं दावा केला आहे की रशियन सैनिकांनी हजारो नागरिकांना रशियाच्या भागात स्थालंतरित होण्यासाठी दबाव टाकला आहे.