आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असं म्हणतात की, प्रश्न विचारायला अक्कल कुठे लागते. आता आम्हाला हे माहितीच नव्हतं. आम्ही वीस बावीस वर्षे तारांकित प्रश्न वगैरे विचारत बसलो. मात्र अनेकांना प्रश्न उपस्थित केले म्हणून संसदरत्न पुरस्कार मिळाला असल्याचा टोला अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडला लगावला. प्रश्न विचारायला अक्कल कुठे लागते या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल करत महाविकास आघाडीचे वाभाडे काढले. तसेच अक्कलेचा प्रश्न असेल तर मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार प्रश्न विचारणे ही आमची चूक झाली. यावेळी त्यांनी क्लास बंद, ग्लास सुरु, असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीचा तीन नावात निकाल लावला.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे वाभाडे काढत त्यांनी महाविकास आघाडी म्हणजे आम्हाला नंतर समजलं महाविनाश आघाडी आहे नंतर कळालं महावसुली आघाडी आणि आता तर मद्य विक्री आघाडीच म्हणावी लागेल अशी टीकाही त्यांनी केली.
डॉ. अनिल अवचट यांनी आयुष्यभर व्यसनमुक्ती काम केले. त्या अनिल अवचट यांचे निधन झाल्यानंतर महाविकास आघाडीने त्यांना सकाळी श्रद्धांजली वाहिली आणि दुपारी आपण किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला. या महाविकास आघाडीच्या निर्णयावर बोलताना त्यांनी मद्यविक्रीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच त्यांनी म्हटले की, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही पण येतात आमच्या मनात प्रश्न ड्राय डेला किराणा दुकान, सुपरमार्केट सुरु राहणार का? असा सवाल उपस्थित करत आता गाडी चालवताना चालक दारू पिऊन गाडी चालवत असतील तर त्यांना फाईन लागणार नाही का? असे सवाल करत त्यांनी कारण एक प्रवक्ते म्हणतात की वाईन म्हणजे दारू नाही असं म्हणत असल्याची आठवण करुन दिली.
वाईनचा निर्णय शेतकऱ्यांना मदत म्हणून घेतला गेला असं सांगतात. मग जाहीर केलेली हेक्टरी 50 हजाराची मदत द्यायला हवी होती, अशी टीकाही त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर केली. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, कोरोना काळातील जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेला भ्रष्टाचार याविषयीही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे भाषण छोटं होतं पण छान असल्याचे सांगत जे सरकारने गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथे फक्त लुटीचे काम होत असल्याचे सांगितले.