3 दिवसात पैसे डबल! या आयपीओने दिला बंपर रिटर्न

गेल्या काही महिन्यांपासून अनेक आयपीओ बाजारात आले आहेत. यापैकी महत्त्वाच्या IPOs नी गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. यापैकी एक आहे एमी ऑर्गेनिक्स केवळ तीन दिवसात या आयपीओने ग्राहकांना डबल रिटर्न दिला आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राइस बँड 610 रुपये निश्चित केला होता. दरम्यान आता शेअरची किंमती इश्यू प्राइसपेक्षा दुप्पट झाली आहे. आज या कंपनीचा शेअर 1280 रुपयांवर बंद झाला आहे. अर्थात जर तुम्ही हा आयपीओ इश्यू झाल्यावर त्यात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 100 टक्के पेक्षा जास्त रिटर्न अवघ्या तीन दिवसात मिळाला आहे. बीएसईवर या शेअरची किंमत 1346 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली होती.

14 सप्टेंबर रोजी कंपनीचा शेअर 48 टक्के प्रीमियमसह 902 रुपयांवर BSE वर लिस्ट झाला होता. आज इश्यू प्राइसपेक्षा शेअरची किंमत 736 रुपयांपेक्षा जास्त आहे. ही किंमत 121 टक्क्यांनी जास्त आहे. आज शेअरची किंमत 1346 रुपयांवर पोहोचली आहे. एमी ऑर्गेनिक्सचा आयपीओला 65 टक्के सब्सक्राइब करण्यात आले आहे. एमी ऑर्गेनिक्सच्या आयपीओसाठी शेअरची किंमत 603-610 रुपये होती. त्याच वेळी, एक लॉट 24 शेअर्सचा होता.

गेल्या 5 ते 10 वर्षांबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीची वाढ प्रभावी आहे. कंपनीवर 135 कोटी रुपयांचे कर्ज आहे, जे आयपीओच्या उत्पन्नातून फेडले जाईल. Ami Organics चा सर्वात जास्त महसूल अॕक्टिव्ह फार्मा इनग्रेडिएंट्स (एपीआय)मध्ये वापरल्या जाणाऱ्या फार्मा इंटरमीडिएट्सच्या विक्रीतून येतो. कंपनी अँटी-सायकोटिक, अँटी-रेट्रोव्हायरल, अँटी-डिप्रेसेंट, अँटी-इनफ्लेमेटरीशी संबंधित फार्मा इंटरमीडिएट्सची विक्री करते. अलीकडेच एमी ऑर्गेनिक्सने गुजरात ऑर्गेनिक्सचे दोन उत्पादन प्रकल्पांचे अधिग्रहण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.