ISIS ताजिकिस्तान, उझबेकिस्तानमध्ये घुसखोरी करण्याची शक्यता

दोन दशकांपासून अफगाणिस्तान दुसरी युद्धभूमी म्हणून ओळखली जात आहे. आधी अमेरिका विरुद्ध तालिबानी, नंतर अफगाणी विरुद्ध तालिबानी आणि आता अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध ही समस्या डोकं वर काढू लागली आहे. तालिबान्यांच्या राज्यात अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना रान मोकळं मिळालं आहे. येथे शेजारच्या देशांना निशाणा बनवण्यासाठी 10 हजार जिहादी सीमांवर तैनात आहेत. रशियाच्या बफरझोनमध्ये ते प्रवेश करण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानात गृहयुद्धाची ठिणगी पडण्याची भीती
तालिबान्यांना जे हवं होतं ते मिळाल्यामुळं अफगाणिस्तानात आता शांतता निर्माण होईल असं वाटत होतं. अमेरिकासुद्धा अफगाणिस्तानातून निघून गेल्यानं युद्धाची स्थिती नसेल असं वाटत होतं. पण अफगाणिस्तानातच आता गृहयुद्धाची ठिणगी पडण्याची भीती आहे. कारण मागील काही दिवासांपासून तशा घडामोडी घडत आहेत.

अफगाणिस्तान व मध्य आशियाई देशांच्या सीमेवर ISIS चे दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ISIS चे 10 हजार दहशतवादी रशियाच्या सीमेवर असल्याची माहिती रशियाने दिली आहे. या ISIS च्या दहशतवाद्यांचा ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये घुसखोरी करण्याचा डाव आहे, असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे या बातम्या समोर येत असताना रशियानं देखील ताजिकिस्तानला 30 अत्याधुनिक रणगाडे पाठवल्याचं सांगण्यात येत आहे.

रशियानंच युद्धाचे इशारे दिले आहेत. अफगाणिस्तानात हाहाकार माजवणारी इसिस आता ताजिकिस्तान व उझबेकिस्तानला निशाण्यावर धरुन आहे. रशियाच्या गुप्तचर संस्थांनी दिलेल्यामाहितीनुसार सध्या इसिसचे 10 हजार दहशतवादी रशियाच्या सीमेवर आहेत. ज्या ठिकाणी त्यांनी आपले अड्डे बनवले आहेत. तिथून ते शेजारच्या ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानात जाणार आहे. घुसखोरीसाठी ते सीमेवरचा कमी गस्तीचा भाग शोधत आहेत. इसिसचे दहशतवादी कुठल्याही क्षणी घुसखोरी करु शकतात. याच कारणामुळे रशियाने जाजिकिस्तानला 30 अत्याधुनिक रणगाडे पाठवले आहेत.

इसिसला रशिया आपला सर्वात मोठा दुश्मन वाटतो. इराकच्या या इसिसचं नामोनिशाण मिटवण्यासाठी रशियानं सीरियात अनेक हवाई हल्ले केलेले आहेत. आता ताजिकिस्तानाच्या सीमेवर इसिसचे 10 हजार दहशतवादी गोळा झालेले आहेत. रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे हे दहशतवादी रशियामध्येही घुसू शकतात अशी पुतीन यांना चिंता आहे. रशियातल्या चेचेन्या भागात इसिसचे दहशतवादी घुसखोरी करण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे रशियाने ताजिकिस्तानला 30 अत्याधुनिक रणगाडे पाठवले आहेत.

इसिसच्या विरोधात केव्हाही लढाई सुरु होऊ शकते
रशियामधून इतर शस्त्रसामुग्रीही रवाना होत आहे. इसिसच्या विरोधात केव्हाही लढाई सुरु होऊ शकते अशी स्थिती आहे. ताजिकिस्तान आणि उझबेकिस्ताननं आपल्या अफगाण सीमांवर गस्त वाढवावी अशी सूचनाही रशियानं दोन्ही देशांना केलीय. इसिसचे दहशतवादी तुमच्या देशात आले तर तुमचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही अशी जाणीव रशियानं करुन दिली आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी थेट लढण्याची भाषा केल्यानं इसिस ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये आश्रय शोधत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.