महिलांच्या बाबतीत राज्य
सरकार पूर्णपणे असंवेदनशील
संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. इथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. मला हे कळत नाही की सरकार इतकं असंवेदनशील कसं आहे की, त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही. जर ते असतं तर महिलांना न्याय मिळाला असता. महाराष्ट्रात राज्य महिला आयोग नसल्याने वेळोवेळी पोलिसांची मदत घ्यावी लागली. महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे सरकार हे पूर्णपणे असंवदेनशील आहे. यांना महिलांबाबत कोणतीही चिंता नाही आहे. राज्य सरकारने याबाबत उत्तर द्यायला हवं,” असे महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटले आहे.
राज्यात मंदिरं कधी उघडणार? राजेश टोपे यांनी दिले स्पष्ट संकेत
राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहे. पण, अजूनही मंदिरं आणि सिनेमागृह उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली नाही. मंदिरं उघडण्याचा निर्णय हा दसरा आणि दिवाळीनंतर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.’मंदिर उघडण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतात. गौरी गणपती सुरू असून आता दसरा आणि दिवाळीचं सण देखील तोंडावर आला आहे. दरम्यान, कोरोनाचे आकडे कमी झाले आणि कोरोना आटोक्यात आला तर दसरा-दिवाळी नंतर राज्यातील मंदिरे पुन्हा खुली होऊ शकतात, असा सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.
राज्यातील महिला सुरक्षेचा
प्रश्न पुन्हा ऐरणीवर : प्रविण दरेकर
राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून याला केवळ सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे. यांना फक्त आपली खुर्ची सुरक्षित कशी ठेवता येईल याचीच काळजी लागून आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सपशेल अपयशी ठरले आहे.” अशी टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे.
अल-कायदा संघटनेचा दहशतवादी
जवाहिरीचा व्हिडिओ आला संमोर
अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेचा नेता अयमन अल जवाहिरीचा मृत्यू झाल्याचं मानलं जात असतानाच अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘अल-कायदा’ने जारी केलेल्या व्हिडीओत जवाहिरी दिसून आला आहे. जवाहिरीचा हा व्हिडीओ अमेरिकेला धक्का देणार असल्याचं म्हटलं आहे, कारण मागील बऱ्याच महिन्यांपासून जवाहिरीचा मृत्य झाल्याचा दावा केला जात होता. अमेरिकेतील एसआयटीई या गुप्तचर गटाकडून या जिहादी गटाच्या ऑनलाइन हलचालींवर लक्ष ठेवलं जातं. याच गटाच्या तपासामध्ये जवाहिरीने अनेक मुद्द्यांचा उल्लेख असणारं भाषण केल्याचं म्हटलं आहे. यामध्ये रशियन लष्करी तळाचाही उल्लेख जावहिरीने केलाय.
श्रीनगर मध्ये पोलीस टीमवर
दहशतवाद्यांचा हल्ला, जवान जखमी
श्रीनगरमधील खानयार भागात आज पोलीस टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर केलल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला. या जवानांच्या छातीवर गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. तर, जखमी जवानाला स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांनी संबंधित परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.
राज्यात पावसाचा
जोर वाढण्याची शक्यता
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागांत रविवारपासून पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. विदर्भातही पावसाचा अंदाज आहे. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत प्रमुख्याने घाट विभागांत तुरळक टिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोयना चांदोली धरणे
भरण्याच्या मार्गावर
गेल्या चार दिवसापासून पश्चिम घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसाने कोयना धरणात १०२ टीएमसी पाणी साठा झाला असून चांदोली धरण काठोकाठ भरण्याची केवळ औपचारिकताच उरली आहे. जिल्हयात मात्र पावसाचा जोर ओसरला असून आता रब्बी हंगामासाठी परतीच्या मान्सूनकडे नजरा लागल्या आहेत. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली असून ती भरण्याच्या जवळ आली आहेत.
अमेझॉन करियर डेमध्ये
देणार नोकरीच्या संधी
ऑनलाईन रिटेल जायंट अॕमेझॉनने जाहीर केले आहे की ते भारतात १६ आणि १७ सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच करिअर डे आयोजित करणार आहे. करिअर डेमध्ये अॕमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांच्याशी फायरसाइड चॅटसह मनोरंजक आणि माहितीपूर्ण सत्रे असतील, जे स्वतःचा करिअरचा अनुभव आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी सल्ला सामायिक करतील. अॕमेझॉन इंडियाचे ग्लोबल सीनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि कंट्री हेड अमित अग्रवाल ओपनिंग इंडिया कीनोट देतील, त्यानंतर अॕमेझॉन नेते आणि कर्मचाऱ्यांशी पॅनल चर्चा होईल.
धोनीची निवड का?
अजय जडेजाला प्रश्न
महेंद्र सिंग धोनीला टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मेंटॉर बनवण्यात आल्याने त्याचे चाहते आणि दिग्गज दोघांनीही याबद्दल आनंद व्यक्त केलाय. मात्र भारताचा माजी फलंदाज अजय जडेजाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले. जडेजाने धोनीला मेंटॉर बनवण्याचा निर्णय समजला नसल्याचं म्हटलं आहे. आपल्याला या निर्णयामागे काय तर्क वापरण्यात आलाय हे समजलं नसल्याचं जडेजाने म्हटलं आहे.
कोंबडीच्या मृत्यू प्रकरणी
उत्तर प्रदेशात खुनाचा गुन्हा
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील एका माजी आमदाराच्या मुलाने त्याच्या कोंबडीचा कथितपणे विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली आहे. सिंदुरिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्या कोंबडीच्या मृत्यूनंतर माजी आमदाराच्या मुलाने पोलीस ठाण्यात ‘खुनाचा’ गुन्हा दाखल केला आहे. माजी आमदाराच्या मुलाने आरोप केला की त्याच्या कोंबडीला विष देण्यात आलं आहे आणि त्यामुळे कोंबडीचे पोस्टमॉर्टम करण्यात यावे.
चीनमधील कारखान्यात
डासांचं प्रोडक्शन
डासांमुळे अनेक आजार होतात जे लाखो लोकांसाठी जीवघेणे ठरतात. डेंग्यू रोग डासांमुळे पावसाळ्यात अनेक लोकांचा बळी घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का की चीनमध्ये एक कारखाना आहे जो दर आठवड्याला 20 कोटी ‘चांगले डासांचं’ प्रोडक्शन करतो. यानंतर हे डास जंगलात आणि इतर ठिकाणी सोडले जातात. या डासांचं काम इतर डासांशी लढा देऊन रोग टाळणं हे आहे. काही डासांना चांगले डास म्हणतात कारण ते आजार पसरवणाऱ्या डासांची पैदास थांबवतात.
SD social media
9850 60 3590