कोकणानंतर विदर्भात पावसाचा राडा! नागपुरात पूर, वीज पडून 11 जणांचा मृत्यू, 1600 घरे उद्ध्वस्त
कोकणानंतर विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. 13 जुलैपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील विदर्भातील नागपूर विभागात अचानक पूर आणि वीज पडून किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 600 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, पावसामुळे नागपूर विभागातील अनेक भागात 875.84 हेक्टर शेतजमिनी बाधित झाल्या आहेत. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार नागपूर विभागात 13 जुलैपासून पूर आणि वीज पडून झालेल्या घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली आणि भंडारा येथे प्रत्येकी तीन, वर्धा आणि गोंदियामध्ये प्रत्येकी दोन आणि चंद्रपूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
साताऱ्यातील महाबळेश्वर व जोर येथे विक्रमी पावसाची नोंद
महाबळेश्वर व जोर येथे मागील पाच दिवसात सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद झाली आहे . महाबळेश्वर, प्रतापगड, तापोळा, चिंचवड, जोर, जांभळी येथे संततधार पाऊस सुरूच आहे. महाबळेश्वर जोर येथे मागील पाच दिवसात एक हजार मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जोरदार वारे, पाऊस, धुके आणि गारठ्याने महाबळेश्वर येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.सध्या महाबळेश्वर येथे पावसाळी पर्यटनाने जोर धरला आहे. दाट धुके, हवेतील गारठा, जंगलात उतरणारे ढग पावसाचा अनुभव पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वर येथे पर्यटक ही अनोख्या निसर्गाचा अनुभव घेत आहेत. शनिवारी महाबळेश्वर येथे १६४ मिमी ,एकूण २७३६.७० (१०७.७४४ इंच) जोर १४७ मिमी(२९४१ मिमी) प्रतापगड १३५ मिमी(२४५९ मिमी) जांभळी ४२मिमी (१५७६ मिमी ) पावसाची नोंद झाली आहे. या पावसाच्या पाण्याने कोयना ,धोम व बलकवडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. महाबळेश्वर पाचगणी ला पाणीपुरवठा करणारा वेण्णा लेक भरून वाहत असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून वेण्णा लेक मधील बोटिंग बंद करण्यात आले आहे.
कौटुंबिक हिंसाचारात पुणे पहिल्या स्थानावर; मुंबईचा क्रमांक दुसरा
राज्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचार सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात होत असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या स्थानावर मुंबई आहे. नागपूर तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर ही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. पुणे शहरात गेल्या सहा महिन्यांत कौटुंबिक हिंसाचाराच्या २९६ घटना घडल्या. मुंबईत २७६, तर नागपुरात २६० गुन्हे दाखल झाले. या तीन शहरांच्या तुलनेत अन्य शहरांत कमी गुन्हे दाखल आहेत. कुटुंब समुपदेशन केंद्र किंवा भरोसा सेलच्या माध्यमातून कौटुंबिक वाद सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पतीचे मद्यप्राशन, अनैतिक संबंधांबाबत संशय, सासू-सासऱ्यांची देखभाल किंवा संसारात जास्त हस्तक्षेप, वैयक्तिक स्वातंत्र्य न मिळणे, अशी काही कारणे या गुन्ह्यांमागे आहेत.
पावसाळ्यात वाढतो आय फ्लूचा धोका
पावसाळ्यात अनेक आजारही येतात. कारण बहुतांश जीवाणू या ऋतूत फुलतात. एकीकडे पूर आणि पावसाने लोक हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे रोगराईही घेरते. डोळा फ्लू यापैकी एक आहे. याला नेत्रश्लेष्मलाशोथ देखील म्हणतात. या डोळ्यांच्या आजारामुळे जळजळ, वेदना आणि लालसरपणा यासारख्या समस्या उद्भवतात.तसे, या रोगाचे कारण म्हणजे एलर्जीची प्रतिक्रिया. परंतु बऱ्याच बाबतीत हे बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे देखील होऊ शकते. हा संसर्ग एका डोळ्यापासून सुरू होतो, परंतु काही काळानंतर दुसऱ्या डोळ्यावरही परिणाम होतो. डोळ्यांशी संबंधित त्रास झाल्यास डोळे लाल होतात. डोळ्यात पाणी येताच जळजळ सुरू होते. या समस्येच्या सुरुवातीला पापण्यांवर पिवळे आणि चिकट द्रव जमा होऊ लागते. डोळ्यात एक विचित्र प्रकारचा डंख आणि सूज आहे. डोळ्यांत पाणी येण्यापासून खाज सुटते. जर संसर्ग खोलवर झाला तर डोळ्यांच्या कॉर्नियालाही इजा होऊ शकते.
“महाग वस्तू खाणं सोडून द्या, आपोआप स्वस्त होतील”, टोमॅटो दरावाढीवर ‘या’ भाजपा मंत्र्याचं अजब वक्तव्य
देशभरात सध्या टोमॅटोचे दर चर्चेचा विषय ठरले आहेत. सर्वसामान्यांपासून अगदी सेलिब्रेटींपर्यंत सगळेच या वाढलेल्या टोमॅटो दरावर बोलत आहेत. या वाढत्या दरांमुळे एकीकडे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टोमॅटो आहेत त्यांना फायदा होत आहे, मात्र मध्यमवर्गीयांचं महिन्याच्या आर्थिक गणितावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे शहरी नागरिकांकडून या दरवाढीवरून सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या मंत्री आणि भाजपा नेत्या प्रतिभा शुक्ला यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.प्रतिभा शुक्ला म्हणाल्या, “पहिली गोष्ट म्हणजे टोमॅटो कुंडीत लावा. सर्व वस्तू महाग आहेत, तर खाणं सोडून द्या. त्या वस्तू आपोआप स्वस्त होतील.”
एकनाथ शिंदेंच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (२२ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ कुटुंब सहपरिवार मोदींच्या भेटीसाठी आले होते. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कुटुंबांची आस्थेने चौकशी केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात शिंदे यांनी ट्वीट करून मोदींचे आभार मानले. शिंदे यांच्या या ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्वीट करत मराठीतून सदिच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी रिट्वीट केलं आहे. “महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे”, असं मोदी म्हणाले.
बांगलादेशमध्ये बस थेट तळ्यात पडल्याने भीषण अपघात, तीन लहान मुलांसह १७ प्रवाशांचा मृत्यू
बांगलादेशमध्ये शनिवारी (२२ जुलै) एक बस थेट तळ्यात पडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण १७ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. बांगलादेशमधील झालाकाठी सदरमधील छत्रकांडा भागात ही घटना घडली. याबाबत एएनआयने डेली स्टारच्या वृत्ताच्या हवाल्याने माहिती दिली आहे.
भारतापुढे ३५३ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य
पुरुषांच्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत अ संघाचा पाकिस्तान अ संघाशी सामना होत आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो टीम इंडियाला महागात पडला. पाकिस्तान अ संघाने ५० षटकांत ८ बाद ३५२ धावा केल्या. भारत अ संघाला विजयासाठी ३५३ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले आहे.
SD Social Media
9850 60 3590