बसच्या धडकेने संरक्षक भिंत अंगावर पडून एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना पालघरमध्ये घडली आहे. या या अपघातात एक मुलगा गंभीर जखमी आहे. पालघर मधील जव्हार बस डेपोतील ही घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
जव्हार बस डेपोत बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास डहाणू – जव्हार बस मागे घेताना या बसची धडक डेपोतील संरक्षक भीतीला लागून भिंत दोन लहान मुलांवर कोसळली होती.
या दुर्घटनेत 11 वर्षीय ओवीस मडकिया याचा मृत्यू झाला असून पंधरा वर्षीय सिंनाल हा गंभीर जखमी झाला होता. सिंनाल याच्यावर जव्हार येथील पतंगशाह कुटीर रुगणालयात उपचार सुरू असून त्याच्या पायाला फेक्चर असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, ही दोन्ही मूलं एकाच कुटुंबातील असून ते मूळचे राजकोट येथील आहेत. आपल्या नातेवाईकाकडे येत असताना बस मधून उतरून आपल्या दोन्ही मुलांना संरक्षक भिंतीच्या बाजूला उभं करून त्यांचे पालक रिक्षा आणण्यासाठी मुख्य रस्त्यावर गेले असताना हा अपघात घडल्याचं प्रत्येक्षदर्शी कडून सांगण्यात येत आहे.