पाच राज्यांमधून काँग्रेसची माघार, भाजपचा मार्ग मोकळा होणार, सर्वेक्षणातील निष्कर्ष

काँग्रेस पक्षाची अस्वस्थता वाढली असावी, साहजिकच. पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होतायत. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात भाजपचे (BJP) सध्या ज्या राज्यांमध्ये सरकार आहे त्या सर्व राज्यांमध्ये निवडणुका जिंकतोय. पंजाब मध्ये काँग्रेस पक्ष निवडणूक हरण्याच्या मार्गावर आहे.जनमत चाचण्या नेहमीच अगदी बरोबर ठरतात असं नाही पण मतदारांच्या मनाचा अंदाज त्यातून येऊ शकतो. ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे.

सी-व्होटर (c voter) नावाच्या कंपनीने एका खासगी टीव्ही चॅनेलसाठी हे सर्वेक्षण केलय. त्यानुसार पंजाबमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल. यात आम आदमी पक्षाला बहुमतासाठी काही जागा कमी पडतील असा अंदाज आहे. सर्वेक्षणानुसार, गेल्या निवडणुकीत 20 जागांसह मुख्य विरोधी पक्ष बनलेल्या ‘आप’ला 117 सदस्यांच्या विधानसभेत 51 ते 57 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर राज्याचा सत्ताधारी काँग्रेस पक्ष 38 ते 46 जागा जिंकून दुसरा क्रमांक पटकावेल. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 77 जागा जिंकल्या. शिरोमणी अकाली दलाला 16 ते 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपा खाते उघडणार नाही किंवा केवळ एखाद्याच जागेची शक्यताय.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपकडे पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळेल अशी शक्यता आहे. भाजपसाठी गूड न्यूज गोवा आणि मणिपूरमध्ये आहे, जिथे 2017 मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. काँग्रेसने येथे सर्वात मोठा पक्ष निवडला होता, पण सरकार स्थापन करण्यात भाजप यशस्वी झाला. उत्तर प्रदेशातील 312 जागांऐवजी भाजप यावेळी 259 ते 277 जागा जिंकेल, असा सी-व्होटरचा अंदाज आहे. जे 403 सदस्यांच्या विधानसभेत स्पष्ट बहुमत असेल. समाजवादी पक्षाला 109 ते 117, बसपला 12 ते 16 जागा आणि काँग्रेस पक्षाला 3 ते 7 जागांचा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलाय.

पंजाब आणि उत्तर प्रदेशकडे पाहुया. काँग्रेस पक्षासाठी पंजाबमधील विजय खूप महत्त्वाचा आहे. पंजाब हे तीन राज्यांपैकी एक आहे जिथे कॉंग्रेस पक्षाचे स्वत: सरकार आहे. पंजाबमधील निवडणुका गमावून दुसऱ्या राज्यात सत्ता मिळवण्यात अपयश आल्यास, 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याचे काँग्रेस पक्षाचे स्वप्न भंगू शकते. राहुल गांधींचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न दिवास्वप्न ठरू शकतं. उत्तर प्रदेशात भाजपसाठी विजय खूप महत्त्वाचा आहे. एकर उत्तर प्रदेशातून भाजपचे सर्वाधिक 80 लोकसभा खासदार निवडूण आलेत.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीचे खासदार आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन सुरु आहे. 9 महिन्यांहून अधिक काळ सामान्य जीवनावर त्याचा परिणाम झालाय. उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा भाजपा सत्तेवर आली तर पुढील लोकसभा निवडणुका जिंकण्याचा भाजपचा मार्ग तर मोकळा होईल. पण भाजपाच्या दाव्याप्रमाणे किसान चळवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि त्यांना जनतेचा पाठिंबा नाही, हेही सिद्ध होईल.

तसे, जनमत चाचण्या कधीही पूर्णपणे अचूक नसतात. सी-व्होटरचा पंजाबमध्ये अंदाज चुकीचा ठरला होता. पंजाबमध्ये 2017 मध्ये 4 फेब्रुवारी रोजी मतदान झाले आणि त्यापूर्वीच सी-व्होटर सर्वेक्षण करण्यात आले. ज्यात कंपनीने ‘आप’च्या विजयाचा अंदाज वर्तविला होता. सर्वेक्षणानुसार, आपला 63 जागा, काँग्रेस पक्ष 43 आणि अकाली दल-भाजप युतीला 11 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला. पण निकाल अगदी उलट आला. काँग्रेस पक्षाला 77 जागा मिळवून एकतर्फी विजय मिळवता आला आणि आपचा विजयी रथ 20 जागांवर थांबला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.