इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 188 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. संधी आहे. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.कुक स्पेशल, ग्राउंड्समन, कुक, GCऑर्डली, MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी), MTS (चौकीदार), बूट मेकर/ रिपेयर, ग्रूम, निम्न श्रेणी लिपिक, बार्बर, मसालची, इक्विपमेंट रिपेयर,वेटर, सायकल रिपेयर, फातिगमन, MTS मेसेंजर, MTS (सफाईवाला), लॅब अटेंडंट या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या
इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी https://www.indianarmy.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी. या पदभरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कुक स्पेशल(12), ग्राउंड्समन, (46) कुक आयटी (03),GC ऑर्डली (33), MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) (10), MTS (चौकीदार) (04), बूट मेकर/ रिपेयर (01), ग्रूम (07), निम्न श्रेणी लिपिक(03), बार्बर (02), मसालची (02), इक्विपमेंट रिपेयर (01),वेटर (11), सायकल रिपेयर (03), फातिगमन (21), MTS मेसेंजर (02), MTS (सफाईवाला) (26), लॅब अटेंडंट (01) जागेवर उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.
इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये अर्ज करणारे उमेदवार दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांना या पदासाठीचे अर्ज 03 जानेवारीपर्यंत पाठवायचे आहेत. संपूर्ण माहिती भरलेला अर्ज आणि कागदपत्रे कमांडंट, इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून या पत्त्यावर पोस्टानं पाठवायचे आहेत.
या पदांवरील अप्रेंटिस करण्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज भरताना शुल्क द्यावं लागणार नाही तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 50 रुपये शुल्क भरावं लागेल.