पेट्रोल डिझेलच्या दरात अंशता घट

पेट्रोलियम कंपन्यांकडून दैनंदिन शिरस्त्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, सोमवारी इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. तत्पूर्वी रविवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 ते 15 पैशांची घट पाहायला मिळाली होती. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 13 पैशांनी स्वस्त होऊन 107.26 रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. तर डिझेलची किंमत प्रतिलीटर 14 पैशांनी घटली असून ते 96.19 च्या पातळीवर आले. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे.

मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. इंधनाच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक गाठला होता. मात्र, जुलै महिन्यात या दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यानंतर संपूर्ण जुलै महिना पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. तर ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात इंधनाचे दर किंचित का होईना कमी झाले होते. चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तब्बल 60 पैशांची कपात झाली होती. गेल्या आठवडाभरापासून इंधनाचे दर स्थिर होते. परंतु, रविवारी त्यामध्ये घट झाली होती. त्यामुळे आगामी काळात इंधनाचे दर स्थिर राहून सामान्यांना दिलासा मिळणार का, हे पाहावे लागेल.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.