श्रीकृष्ण गोकुळाष्टमी आणि चौथा श्रावणी सोमवार निमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्याला फळाफुलांनी सजवण्यात आलं आहे. यावेळी वेगवेगळी पाचशे किलो फळे आणि दोन हजार किलो आकर्षक फुलांनि देवाचा गाभारा सजवण्यात आला आहे.
श्रीकृष्ण गोकुळाष्टमी आणि चौथा श्रावणी सोमवार निमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्याला फळाफुलांनी सजवण्यात आलं आहे.
यावेळी वेगवेगळी पाचशे किलो फळे आणि दोन हजार किलो आकर्षक फुलांनि देवाचा गाभारा सजवण्यात आला आहे.
पुणे येथील श्री विठ्ठल भक्त पांडुरंग मोरे आणि नानासाहेब मोरे यांच्या वतीने देवाचा सजवण्यात आलाय.
यामध्ये सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागाना मोसंबी, पेरु, अननस, कलिंगड, सिताफळ, ड्रागनफ्रुट, सफरचंद, डाळिंब अशा पाचशे किलो फळांची सजावट करण्यात आली आहे.
तर विविध आकर्षक अशा गुलाब, ऑर्किड, एंथेरियम, लिली, झेंडू, शेवंती, जाई, जुई अशा विविध प्रकारच्या दोन हजार किलो पानाफुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.