महिंद्रा अँड महिंद्रा अनेक वर्षांपासून स्कॉर्पिओची विक्री करत आहे आणि या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत केलेल्या अपग्रेडमुळे या एसयूव्हीची कंटीन्यूटी वाढण्याची शक्यता आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्ही विभागातील वाढत्या स्पर्धेवर मात करण्यासाठी, स्कॉर्पियो एक्सटर्नल आणि इंटर्नल बदलांसह नवीन जनरेशनमध्ये बदलत आहे. याशिवाय, गेल्या काही महिन्यांत कॅमेऱ्यात कैद झालेले स्पाय शॉट्स लक्षात घेता, यात नवीन फीचर्स आणि टेक्नोलॉजी मिळेल, हे स्पष्ट झालं आहे.
दुसऱ्या पिढीच्या महिंद्रा स्कॉर्पियोची काही दिवसांपूर्वी चाचणी घेण्यात आली आहे आणि प्रोटोटाइप नवीन एलईडी डे टाइम रनिंग लाइट्स, पुन्हा डिझाइन केलेल्या वर्टिकल स्लॅट्ससह रिस्टाईल ग्रिल, डिटेल्ड सेंट्रल एअर इनलेट्ससह अपडेटेड बम्पर, नवीन फॉग लॅम्प्स. हेडलॅम्पची उपस्थिती देखील दर्शवते. स्कॉर्पियोचा उंच पिलर आणि सरळ रेश्यो कायम ठेवण्यात आला आहे. या एसयूव्हीमध्ये एक मोठी केबिन मिळाली पाहिजे. मागील टेल लॅम्प आणि अपडेटेड बंपर आणि टेलगेटसह अनेक अपडेट्स मिळतील.
ऑल-न्यू स्कॉर्पियो या कारमध्ये कंपनीने काही बदल केले आहेत. आगामी स्कॉर्पियो नवीन लॅडर-फ्रेम चेसीवर आधारित असेल. या कारच्या लीक झालेल्या फोटोवरुन अंदाज बांधला जातोय की, आगामी स्कॉर्पियोमध्ये सध्याच्या स्कॉर्पियोच्या तुलनेत मोठं फुटप्रिंट असेल, ही नवीन फ्रंट ग्रिलने लेस असेल. यामध्ये वर्टिकल स्लॅट्ससह मध्यभागी कंपनीचा लोगो असेल.
स्कॉर्पियोच्या नवीन हेडलॅम्प्सना रीमॉडेल्ड ट्विन-पॉड हेडलॅम्प्सद्वारे फ्लँक केले जातील. बोनेट थोडं लांब असेल आणि एक नवीन फ्रंट बम्परही दिलं जाईल. मागच्या बाजूचं टेलगेटही मोठं असेल. एलईडी टेललाइट्स आणि रूफ-माउंटेड स्टॉप लँपसह येईल. असं म्हटलं जातंय की कंपनी ही कार 12 लाख रुपये इतक्या किंमतीत लाँच करु शकते. ही या लाईनअपमधील सर्वात स्वस्त कार असेल.
महिंद्राची नेक्स्ट जनरेशन New Scorpio ही गाडी ZEN3 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नव्या महिंद्रा स्कॉर्पियोच्या नव्या डिझाईनमध्ये, ज्यादा जागा, नवा इंटेरियर लूक आणि लांब व्हीलबेसच्या सह लाँच केले जाणार आहे. या कारमध्ये 2.2 लीटर टर्बोचार्ज्ड डीझेल आणि 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमेटिक ट्रांन्समिशन सुविधा उपलब्ध असेल.
महिंद्रा स्कॉर्पियो मध्ये BS6 कम्प्लायंट 2.2-लीटर mHawk डिझेल इंजिन मिळणार आहे. जे 138bhp चे पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क जनरेट करते. एस 5 व्हेरियंटमध्ये या इंजिन सोबत 5 स्पीड मॅन्यूअल, तर अन्य व्हेरियंट सोबत 5 स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स मिळणार आहे. बीएस 6 मॉडल मध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे ऑप्शन दिले नाही.
स्कॉर्पियोचं अपडेटेड मॉडलसुद्धा आधी प्रमाणे 7 स्लॉट ग्रिल, मोठे प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी गाइड लाइट्स, क्रोम एक्सेट्स सोबत राउंड फॉग लॅम्प्स, हुड स्कूप, 5 स्पोक 17 इंच अलॉय व्हिल्ज, टर्न इंडिकेटर्स सोबत आउट साइट रियर व्ह्यू मिरर्स आणि रेड लेन्स एलईडी टेल लॅम्प्स सोबत येते.