टोकियो पॅरालिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. देवेंद्र झाझरियानं रौप्यपदक तर सुंदर गुजरनं कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
त्यामुळे आलाफेकमध्ये भारतीय खेळाडूंच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर पडली आहे. यासोबतच भारतानं आतापर्यंत पॅरालिम्पिकमध्ये 7 पदकांची कमाई केली आहे.
योगेश कठुनियानं थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे.योगेशनं 44.38 मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं.