पत्नीच्या छळ प्रकरणी पुण्याच्या उद्योगपती गणेश, नानासाहेब गायकवाड यांना अटक

दीड महिन्याच्या तपासानंतर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेले फरार आरोपी प्रसिद्ध उद्योगपती गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड यांना उडपीमधून अटक करण्यात आली आहे. पत्नीला सिगरेटचे चटके देऊन मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच बलात्कार, खंडणी आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे देखील दाखल दाखल करण्यात आले होते. अखेर पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी गायकवाड कुटुंबावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या गायकवाड कुटुंबीयांची औंधमध्ये कोट्यवधींची मालमत्ता आहे.

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील उद्योजक नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याच्यासह पाच जणांवर काही दिवसांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. पत्नीला शाररिक आणि मानसिक त्रास देणे, जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात आरोपी असलेला गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नाना गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुकतालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. पण आकोपी फरार होते. त्यांचा तपास पोलीस करत होते. अखेर त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी गायकवाड पिता-पुत्रांना उडपीमधून अटक केली आहे.

नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगा करुन खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करुन मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, दरोडा घालणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. संबंधित गुन्हे हे पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी, सांगवी, पुणे शहरातील चतुर्श्रुंगी, चंदननगर आणि पुणे ग्रामीण पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.

सर्व आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करत वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि राजकारणी गणेश गायकवाड याच्यावर गंभीर आरोप आहेत. त्याने ज्योतिषी रघुनाथ येमूल याच्या सल्ल्यानुसार पत्नीवर अघोरी प्रथांचा वापर करुन छळ केला. गणेश गायकवाड याने आपल्या 27 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार स्वत: पीडित महिलेने पोलीस ठाण्यात केली होती. पतीने अघोरी प्रकाराने ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. विशेष म्हणजे गणेश गायकवाड याची पत्नी एका माजी आमदारांची मुलगी आहे. तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पण येमुले गुरुच्या सल्ल्यामुळे त्यांच्या संसराचा खेळ खंडोबा झाला. (फोटो क्रेडिट गुगल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.