नाशिकच्या शेतकऱ्यांचा 29 ऑगस्टला जिल्हाव्यापी ट्रॅक्टर मार्च

कृषी कायदे रद्द करण्यासाठी नवी दिल्लीत शेतकऱ्यांनी गेल्या नऊ महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आता नाशिकच्या शेतकऱ्यांनी दंड थोपाटले आहेत. नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीने येत्या 29 ऑगस्ट रोजी जिल्हाव्यापी ट्रॅक्टर मार्चची हाक दिली आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच हा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीची 16 ऑगस्ट रोजी नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बैठक झाली. या बैठकीला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, निफाडचे आमदार दिलीप बनकर, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप, नगरसेवक सुधाकर बडगुजर, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच माकप व भाकपचे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून हजारो ट्रॅक्टर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला 500 पेक्षा जास्त शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे, योगेश घोलप, नगरसेवक सुधाकर बडगुजर, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, आयटकचे राजू देसले, सीटूचे तानाजी जायभावे यांनी मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कायद्यामुळे शेतकरी व शेती धंदा कसा उद्धवस्त होणार आहे यावर सर्वच नेत्यांनी प्रकाश टाकला. (फोटो क्रेडिट गुगल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.