कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला या तारखेपासूनच सुरुवात; शास्त्रज्ञाच्या दाव्यानं वाढली चिंता ,सावध राहा !

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. याचदरम्यान हैदराबाद युनिव्हर्सिटीत प्रो व्हाइस चांसलर राहिलेल्या ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञांनी एक चिंता वाढवणारा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतात कोरोनाची तिसरी लाट  साधारणतः 4 जुलैपासूनच सुरू झाली आहे.

गेल्या 463 दिवसात देशातील रुग्णसंख्या आणि मृत्यूची संख्या यांचा अभ्यास करण्याचा विशेष मार्ग विकसित करणारे डॉ. विपिन श्रीवास्तव म्हणाले की, 4 जुलै ही तारीख या वर्षाच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यासारखी दिसते. श्रीवास्तव यांनी 24 तासांच्या कालावधीत मृत्यूची संख्या आणि त्याच काळात उपचार घेत असलेल्या नवीन रूग्णांच्या संख्येचे प्रमाण मोजले आणि या विशेष पद्धतीचं नाव डीडीएल ठेवलं. ते म्हणाले, ‘आम्ही डीडीएलमधील ही अस्थिरता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पाहिली होती. ते म्हणाले, की त्यावेळी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 100 च्या क्रमात किंवा त्यापेक्षा कमी होती आणि आम्ही कोरोना संपल्याच्या भ्रमात होतो. पण नंतर परिस्थिती भयानक झाली. श्रीवास्तव म्हणाले की, अशाच ट्रेंडची सुरुवात 4 जुलैपासून अशाच ट्रेंडची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं.

श्रीवास्तव म्हणाले, की डीडीएल चुकीचं ठराव इतकीच आशा आता आहे. ते म्हणाले, की दुसऱ्या लाटेचं  भयंकर रूप पाहता लोक आणि सरकारी दोघांनीही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. तसंच नवीन लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घ्यायला हवी. डीडीएलमध्ये नवीन रुग्णसंख्येच्या तुलनेत मृतांच्या आकड्यांमध्ये मोठी घट पाहायला मिळते. फेब्रुवारीमध्येही अशीच परिस्थिती दिसली आणि यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. सध्याही असाच ट्रेंड असल्यानं शास्त्रज्ञांना तिसरी लाट सुरू झाल्याची भीती आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात एका दिवसात कोरोनाचे 37,154 नवे रुग्ण आढळले आहेत. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून 3,08,74,376 वर पोहोचली आहे. तर, देशातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 4,08,764 वर पोहोचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.